मोदी मुर्दाबादच्या घोषणा देऊ नका राहुल गांधी यांच्या सूचना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 04:48 IST2019-02-08T04:48:02+5:302019-02-08T04:48:18+5:30

‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊ नका अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

Rahul Gandhi's suggestions should not be proclaimed Modi Murdabad | मोदी मुर्दाबादच्या घोषणा देऊ नका राहुल गांधी यांच्या सूचना  

मोदी मुर्दाबादच्या घोषणा देऊ नका राहुल गांधी यांच्या सूचना  

नवी दिल्ली : ‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊ नका अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली आहे. लोकसभा निवडणुकांत प्रेम व स्नेहभाव राखून काँग्रेसला भाजपावर विजय मिळवायचा आहे, असेही ते म्हणाले.

ओडिशातील सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देताच त्यांना राहुल यांनी रोखले. त्यांनी सांगितले की, मुर्दाबाद या शब्दाचा वापर भाजपा/रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. काँग्रेसमध्ये असे शब्द वापरण्याची परंपरा नाही.

निवडणूक आयोगापासून न्यायव्यवस्थेपर्यंतच्या प्रत्येक यंत्रणेवर रा. स्व. संघ नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये सरकारी यंत्रणांमध्ये शिरलेल्या संघ स्वयंसेवकांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. डोकलाममध्ये चीनच्या लष्कराने घुसखोरी केली, तेव्हा मोदी हाताची घडी घालून गप्प बसले होते. संसदेत राष्ट्रीय सुरक्षा, राफेल घोटाळा आदी प्रश्नांवर माझ्याशी चर्चा करण्याची हिम्मत दाखविण्याऐवजी ते पळून जातात.

Web Title: Rahul Gandhi's suggestions should not be proclaimed Modi Murdabad