शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' विधानावरून वाद; गडकरी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 18:21 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया या केलेल्या शब्दप्रयोगावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे.

नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया या केलेल्या शब्दप्रयोगावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. लोकसभेतही भाजपानं राहुल गांधींना या विधानावरून घेरलं असून, राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बलात्कारासारख्या गंभीर विषयात राजकारण करण्याची गरज नाही. राहुल गांधींना कधी काय बोलायचं हे अजूनही समजत नाही. त्यांना बोलायची शिस्त नाही, असंही म्हणत नितीन गडकरींनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं. सीएनएन न्‍यूज18शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. गडकरी म्हणाले, राहुल गांधींना बोलण्याची शिस्त नसून, त्यांना अजून बरंच काही शिकायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासासाठी मेक इन इंडियासारखे कार्यक्रम राबवले आहे, त्याची तुलना बलात्कारासारख्या आरोपाशी करून त्या कार्यक्रमाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  काँग्रेसच्या राज्यात आणि सध्याच्या काँग्रेसशासित राज्यात बलात्कार होत नाही आहेत काय?, असा प्रश्नही गडकरींनी उपस्थित केला आहे. दरम्यान भाजपाचे चंपारण्यमधील भाजपा खासदार संजय जयस्वाल यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला होता. 2000 वर्षांपूर्वी विष्णुगुप्त चाणक्य यांनी म्हटलं होतं की, परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. लोकसभेत स्मृती इराणी आणि इतर भाजपा खासदारांनी राहुल गांधींच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला होता. राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?, असं जयस्वाल म्हणाले होते. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. असं विधान करणाऱ्या नेत्याला संसदेचा सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचंही निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRahul Gandhiराहुल गांधी