"चिनी सैन्य भारतात घुसले, चार टँक...!"; राहुल गांधींच्या दाव्यानं संसदेत मोठा गदारोळ! राजनाथ, शाह यांनी दिलं ओपन चॅलेन्ज! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:50 IST2026-02-02T15:49:05+5:302026-02-02T15:50:15+5:30

माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून वाद...

Rahul Gandhis claim caused a huge uproar in Parliament Rajnath Singh, Amit Shah stood up and gave an open challenge What exactly happened mm naravane book issue | "चिनी सैन्य भारतात घुसले, चार टँक...!"; राहुल गांधींच्या दाव्यानं संसदेत मोठा गदारोळ! राजनाथ, शाह यांनी दिलं ओपन चॅलेन्ज! नेमकं काय घडलं?

"चिनी सैन्य भारतात घुसले, चार टँक...!"; राहुल गांधींच्या दाव्यानं संसदेत मोठा गदारोळ! राजनाथ, शाह यांनी दिलं ओपन चॅलेन्ज! नेमकं काय घडलं?

सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना डोकलामचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर संसदेत मोठा गदारोळ सुरू झाला. राहुल गांधी यांनी डोकलामसंदर्भात भाष्य करताच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि 'राष्ट्रपतींच्या अभिभाषणात या मुद्दाचा कसलाही उल्लेख नाही', असे म्हणाले. राहुल गांधींनी संसदेत डोकलाम आणि चीनचा उल्लेख केल्यानंतर, राजनाथ सिंह यांनी त्यांच्या विधानाला विरोध करण्यास सुरुवात केली.

माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून वाद -
राहुल गांधी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या न प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा हवाला देत, त्यातील चीन आणि डोकलामसंदर्भातील  विधानांचा उल्लेख करू इच्छित होते. मात्र, राजनाथ सिंह यांनी यावर आक्षेप घेतला आणि राहुल गांधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत, ते कधीच प्रकाशित झाले नाही. राहुल यांचा संदर्भ चुकीचा आहे, असे सांगितले. यावर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखले आणि जे पुस्तक अद्याप प्रकाशितच झालेले नाही, त्यावर संसदेत चर्चा केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

गृहमंत्री अमित शाह यांचा आक्षेप -
यानतंर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधींवर आक्षेप घेतला आणि 'हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही, हे राहुल गांधी यांनी सांगावे, असे म्हणाले. यावर, "सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका आणि अनावश्यक भाष्यही करू नका", असे राजनाथ सिंह म्हणाले.

काय म्हणाले राहूल गांधी? -
राहुल गांधी म्हणाले, उनका स्रोत प्रामाणिक आहे आणि यात (एक प्रकाशित मासिक) माजी आर्मी जनरल (एमएम नरवणे) यांच्या अप्रकाशित पुस्तकाचे कोट आहेत. एमएम नरवणे यांच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले, चिनी सैन्याचे टँक भारतीय सीमेजवळ आले आणि चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला. चार चिनी टँक भारतीय सीमेत प्रवेश करत होते. चिनी सैन्याचे टँक कैलास पर्वतरांगावर चढत होते.

"सभागृह नियमांनुसार चालते" -
विरोधकांवर निशाणा साधत राहूल म्हणाले, "हे लोक पुस्तकाला घाबरत आहेत. जर ते घाबरत नसतील तर त्यांनी मला ते वाचू द्यावे." यावर, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, 'सभागृह नियमांनुसार चालते.'

Web Title : राहुल गांधी के दावे से संसद में हंगामा; शाह, सिंह ने दी चुनौती!

Web Summary : राहुल गांधी के डोकलम संबंधी बयान से संसद में हंगामा हुआ। राजनाथ सिंह और अमित शाह ने उनके बयान को चुनौती दी, जिसमें एक अप्रकाशित पुस्तक का हवाला दिया गया। स्पीकर ने संसदीय नियमों पर जोर दिया।

Web Title : Rahul Gandhi's claim sparks uproar; Shah, Singh challenge in Parliament!

Web Summary : Rahul Gandhi's Doklam remarks in Parliament triggered a major uproar. Rajnath Singh and Amit Shah challenged his statements, citing an unpublished book. The Speaker intervened, emphasizing parliamentary rules.