राहुल गांधी विदेश दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 03:48 IST2020-02-20T03:48:42+5:302020-02-20T03:48:59+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी बुधवारी टिष्ट्वटरवरून हिंदीतून

Rahul Gandhi to tour abroad | राहुल गांधी विदेश दौऱ्यावर

राहुल गांधी विदेश दौऱ्यावर

हरीश गुप्ता ।

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आठवडाभराच्या सुटीवर विदेशात गेले आहेत. काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल गांधी रोमला रवाना झाले आहेत. नंतर ते अन्य युरोपीय देशांत जाण्याची शक्यता आहे. तथापि, ते आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून घडामोडींवर लक्ष ठेवून टष्ट्वीट करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी बुधवारी टिष्ट्वटरवरून हिंदीतून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्रही आहे. दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा विदेश दौरा आहे. ते लंडनला जाणार असल्याचे समजते. तथापि, पक्षातील कोणीही राहुल गांधी यांच्या विदेश दौºयाला दुजोरा देण्यास तयार नाही.

Web Title: Rahul Gandhi to tour abroad