शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: संसदेच्या गेटवर राडा! राहुल गांधींनी गद्दार म्हटल्याने बिट्टू भडकले, म्हणाले "देश के दुश्मन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:42 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Rahul Gandhi Jabs Minister Ravneet Bittu: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुधवारी संसद परिसरात शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळाली. मकर द्वारपाशी काँग्रेस खासदारांचे आंदोलन सुरू असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात जोरदार वाक् युद्ध रंगले. राहुल गांधींनी बिट्टू यांना गद्दार दोस्त म्हटले, तर बिट्टू यांनी गांधींना थेट देशाचा शत्रू म्हणत पलटवार केला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काँग्रेसचे आठ खासदार निलंबित झाल्याच्या निषेधार्थ राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मकर द्वारावर निदर्शने सुरू होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू तेथून जात असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडे पाहून उपहासाने म्हटले, "बघा, एक गद्दार इथून जात आहे, त्याचा चेहरा बघा." इतकेच नाही तर राहुल गांधींनी हात मिळवण्यासाठी हात पुढे करत म्हटले, "नमस्ते भाई, माझ्या गद्दार मित्रा! काळजी नको करू, तू पुन्हा (काँग्रेसमध्ये) परत येशील."

राज्यमंत्री बिट्टू यांचा पलटवार

राहुल गांधींनी मैत्रीचा हात पुढे केला खरा, पण रवनीत बिट्टू यांनी तो झिडकारला आणि चोख प्रत्युत्तर दिले. "देशाच्या शत्रूंशी माझा काहीही संबंध नाही," असं बिट्टू यांनी म्हटलं. राहुल गांधींना देशाचा शत्रू म्हणत त्यांनी हात मिळवण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ खडाजंगी झाली आणि ते एकमेकांकडे पाहत पुढे निघून गेले.

रवनीत सिंह बिट्टू यांचा राजकीय प्रवास राहुल गांधींच्या भेटीतूनच सुरू झाला होता. बिट्टू हे तीन वेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत पराभव होऊनही भाजपने त्यांना मंत्रिपद दिले. खलिस्तानी दहशतवाद्यांनी बिट्टू यांच्या आजोबांची (बेअंत सिंह) हत्या केली होती, त्यामुळे बिट्टू हे कट्टरतावाद्यांचे प्रखर विरोधक मानले जातात.

राहुल गांधींवर यापूर्वीही टीका

दोन्ही नेत्यांमधील हा संघर्ष नवा नाही. सप्टेंबर २०२४ मध्ये बिट्टू यांनी राहुल गांधींवर शिखांना विभागण्याचा आरोप करत त्यांना देशातील नंबर एकचा दहशतवादी म्हटले होते. अमेरिकेत राहुल गांधींनी शिखांच्या संदर्भात दिलेल्या विधानानंतर हा वाद टोकाला गेला होता.

दुसरीकडे, भारत-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेस खासदार संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. पंतप्रधानांनी तडजोड केली, असे फलक त्यांच्या हातात होते. मंगळवारी गैरवर्तवणुकीच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या ८ खासदारांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Parliament ruckus: Rahul Gandhi calls Bittu 'traitor,' sparks fiery exchange.

Web Summary : Rahul Gandhi labeled Ravneet Bittu a 'traitor' at Parliament, triggering a heated argument. Bittu retorted, calling Gandhi an 'enemy of the country.' The incident unfolded during a Congress protest and quickly went viral.
टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा