शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदी पुन्हा सरेंडर करणार', भारत-अमेरिका ट्रेड डीलवरून राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:02 IST

Rahul Gandhi Slams PM Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' वादाचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत.

Rahul Gandhi Slams PM Modi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' वादाचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. भारत-अमेरिका व्यापार करारात देशहिताशी तडजोड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

ट्रम्प यांच्या टॅरिफवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय

अमेरिकन सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ रद्द करताना म्हटले की, राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारे शुल्क लादण्याचा अधिकार नव्हता. मात्र, या निर्णयानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर 10 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. नव्या आदेशावर स्वाक्षरी करून जगभरातील देशांवर 10% ग्लोबल टॅरिफ लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट हल्ला

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "पंतप्रधानांनी करार करून टाकला. त्यांची फसवणूक आता उघड झाली आहे. ते पुन्हा वाटाघाटी करू शकत नाहीत; केल्या तर पुन्हा शरणागतीच पत्करतील."

यापूर्वीही ट्रेड डीलवरून टीका

ट्रेड डील आणि टॅरिफच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी याआधीही सरकारवर अनेकदा टीका केली आहे. संसदेत तसेच सार्वजनिक मंचांवर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. बजेट सत्रादरम्यानही या विषयावर जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ पाहायला मिळाला.

भारत-अमेरिका व्यापार करार

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत दीर्घकाळ चर्चा सुरू होती. विविध क्षेत्रांतील मतभेदांनंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला सहमती झाली आणि 7 फेब्रुवारीला कराराची घोषणा करण्यात आली. करारानुसार, भारतीय कृषी उत्पादने अमेरिकेत शून्य टॅरिफवर निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अमेरिकन कृषी उत्पादकांना भारतात विशेष टॅरिफ सवलत देण्यात आलेली नाही. सरकारचा दावा आहे की, शेतकरी आणि दुग्धव्यवसायाच्या हितांशी कोणतीही तडजोड केलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi to 'surrender' again, Rahul Gandhi slams India-US trade deal.

Web Summary : Rahul Gandhi criticizes PM Modi over the India-US trade deal, alleging compromised national interests after a US court ruling on tariffs. He claims Modi will 'surrender' again, unable to renegotiate the agreement.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत