शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळावं; भाजपचा नगरपालिकेत अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:22 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला होता

छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या ५२ व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. तसेच, गेल्या ५२ वर्षांपासून आपल्याला आजही घर नाही, असेही त्यांनी म्हटलं. या अधिवेशन कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी भूतकाळातील, बालपणीच्या भावूक आठवणींचा किस्सा सांगितला. आता, भाजपने राहुल गांधींच्या या किस्स्यावरुन काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केलंय. राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या वायनाड येथील भाजपने राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळावे, यासाठी अर्ज केला आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला होता. मी ७ वर्षांचा असताना आम्हाला घर सोडावं लागलं, जे सरकारी होतं. आज, ५२ वर्षे झाली मला घर नाही, असे राहुल गांधींनी म्हटले होते. त्यानंतर, आता भाजपने राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. वायनाड भाजपने कलपेट्टा नगरपालिका सचिवांना एक निवेदन देऊन,  राहुल गांधींसाठी घराची मागणी केली आहे. त्यानुसार, राहुल गांधींचं नाव पंतप्रधान आवास योजनेत घेण्याचं आणि त्यांना घर मंजूर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. 

वायनाडचे भाजप जिल्हाध्यक्ष केपी मधु यांनी बुधवारी राहुल गांधींना निशाण्यावर घेतलं. आम्ही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जमीन आणि एक घर मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. हे घर जिल्ह्याच्या एरिया सेंटर भागात असावे असेही त्यांनी म्हटले. तसेच, हे घर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण, आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी ते या घरी वायनाडला येऊ शकतात, असेही मधु यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते राहुल गांधी

मी वयाच्या ६ वर्षांचा होतो, तेव्हा आम्हाला राहता बंगला सोडून जायचं होतं. सन १९७७ ची गोष्ट आहे, निवडणूक आली होती, मला काहीही कळत नव्हतं. घरी वेगळंच वातावरण होतं. मी आईकडे गेलो आणि आईला विचारलं काय झालंय. तेव्हा आईने सांगितलं, आपण हे घर सोडतोय. तोपर्यत ते घर आमचंच आहे, असं मला वाटायचं. पण, आईने सांगितलं, राहुल हे आपलं घर नाही, हे सरकारी घर आहे. मग, मी प्रश्न केला आई कुठे जायचंय, तर आई म्हटली, माहिती नाही. मला काहीच समजेना. कारण, ते घर मी आमचंच समजत होतो. ५२ वर्षे झाली माझ्याकडे घर नाही, आजपर्यंत माझ्याकडे घर नाही, असा भावनिक किस्सा राहुल गांधींनी या अधिवेशनात सांगितला. मी १२ तुलघक रोडवर राहतो, पण माझ्यासाठी ते घर नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसHomeसुंदर गृहनियोजन