शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

राहुल गांधी म्हणाले, लव्ह यू मोदी... अन् सभागृहात एकच आवाज घुमला 'मोदी-मोदी'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 3:25 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी आपण मोदींप्रमाणे द्वेशाचे नाही तर प्रेमाचे राजकारण करतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण...

पुणे - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने चर्चा करत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. पण गप्पांच्या ओघात नरेंद्र मोदींचा विषय निघताच राहुल गांधी यांनी आपण मोदींप्रमाणे द्वेशाचे नाही तर प्रेमाचे राजकारण करतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच 'लव्ह यू मोदी' म्हणत आपण मोदींवरही प्रेम करतो असे सांगितले. मात्र राहुल गांधी यांनी  'लव्ह यू मोदी' असा उच्चार करताच संपूर्ण सभागृहात  'मोदी-मोदी' असा आवाज घुमला. त्यामुळे सभेनंतर या घटनेची चर्चा सुरू होती. काँग्रेस अध्यक्ष  राहुल यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. शिक्षण, बेरोजगारी, ७२ हजाराचा 'न्याय', याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि मोदी सरकारच्या अपयशावरही बोट ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुक्त कार्यक्रमांमध्ये सहभागी का होत नाहीत? प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांना त्याची उत्तरं द्यावीच लागतील. पण आपल्यालाच सगळं माहीत आहे आणि इतरांना काहीच कळत नाही, हा मोदींचा अ‍ॅटिट्यूड आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच मोदींबद्दल आपल्या मनात अजिबात राग नाही, पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्काराची भावना आहे, असेही त्यांनी नमूद केले. ''नरेंद्र मोदी यांच्यावर माझं प्रेम आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. पण ते माझा तिरस्कार करतात. अर्थात, त्यालाही माझी हरकत नाही,'' असा टोला लगावत राहुल गांधी यांनी  'लव्ह यू मोदी' म्हटले. मात्र राहुल गांधी यांचे हे उच्चार ऐकताच संपूर्ण सभागृहामधून  'मोदी-मोदी' असा आवाज घुमू लागला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019