शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कधी पीएम मोदींना मिठी तर सिंधियांना मारला डोळा; आता फ्लाइंग KISS मुळे राहुल गांधी चर्चेत…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 18:07 IST

Parliament Mansoon Session: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर फ्लाइंग किस केल्याचा आरोप केला आहे.

Parliament Mansoon Session: सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून यात विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर चर्चेदरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या एका कथित कृतीची चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींवर 'फ्लाइंग किस' (Flying Kiss) केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या या कृतीविरोधात महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. 

एनडीएच्या (NDA) अनेक महिला खासदारांनी दावा केलाय की, राहुल गांधी भाषण संपवून सभागृहाबाहेर जात असताना महिला खासदारांच्या दिशेने फ्लाइंग किस केले. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी लोकसभेत विचित्र किंवा अनोखी कृती करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 च्या अधिवेशनात राहुल गांधी आपल्या सहकारी खासदाराला डोळा मारुन आणि पंतप्रधान मोदींना मिठी मारुन चर्चेत आले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभागृहात मिठी मारली2018 मध्येही विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. या अविश्वास प्रस्तावातील चर्चेदरम्यान राहुल गांधी भाषण करत होते. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, माझ्या बोलण्यात सत्य आहे, म्हणूनच पीएम मोदी माझ्याशी नजर मिळवायला घाबरत आहेत. मी भाजप आणि आरएसएसचा आभारी आहे, ज्यांनी मला काँग्रेसचा खरा अर्थ समजून सांगितला आणि शिवभक्त बनवले. यानंतर ते आपल्या आसनावरुन उठले आणि पीएम मोदींकडे (Narendra Modi) जाऊन त्यांना मिठी मारली. 

ज्योतिरादित्य सिंधियांना डोळा मारलात्याचदरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, भाजपवाले मला शिव्या देऊ शकतात, पण मला राग येत नाही. मी काँग्रेस आहे आणि याच भावनेने देशाला बनवले आहे. याच भावनेला तुमच्यातून काढेल आणि तुम्हालाही काँग्रेसमध्ये आणले. यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारली आणि आपल्या आसनावर येऊन बसले. यावेळी त्यांनी बाजुला बसलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना डोळा मारला. तेव्हा सिंधिया काँग्रेसमध्ये होते. त्यांची ही कृती खूप व्हायरल झाली होती.

फ्लाइंग किसने राहुल पुन्हा चर्चेत आता परत एकदा विरोधकांकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावावर तीन दिवस चर्चा होणार आहे. चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी भाषण करत होते. भाषण संपवून ते सभागृहाबाहेर जाताना त्यांनी महिला खासदारांना फ्लाइंग किस केल्याचा आरोप आहे. याविरोधात एनडीएकील महिला खासदारांनी सभापतींकडे या कृतीविरोधात तक्रार केली आहे. यावर अद्याप राहुल गांधींकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन