'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:02 IST2025-05-04T13:01:44+5:302025-05-04T13:02:15+5:30

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi on Sikh Riots: 'What happened then was very wrong', Rahul Gandhi's big statement on the 1984 Sikh riots | 'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान

'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान

Rahul Gandhi on Sikh Riots: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. या कार्यक्रमादरम्यान एका शीख विद्यार्थ्याने राहुल गांधींना 1984 च्या दंगली आणि शीख मुद्द्यांवर काही प्रश्न विचारले.

त्या विद्यार्थ्याने राहुल गांधींना विचारले की, 'तुम्ही म्हणालात की, राजकारण निर्भय असले पाहिजे, घाबरण्यासारखे काहीही नसावे. पण, आम्हाला फक्त कढा घालायचा नाही, आम्हाला फक्त पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, जे काँग्रेस पक्षाच्या राजवटीत नव्हते. त्या दंगलीतील आरोपी सज्जन कुमार सारख्या लोकांना संरक्षण देत असलेल्या शीख आवाजांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या विद्यार्थ्याने काँग्रेसवर केला.

राहुल गांधी काय म्हणाले?
यावर राहुल गांधी म्हणाले की, मी नव्हतो, त्यावेळी पक्षाच्या अनेक चुका झाल्या. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात झालेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी घेण्यास मी आहे. मी जाहीरपणे म्हटले आहे की, 80 च्या दशकात जे घडले, ते चुकीचे होते. मी अनेकवेळा सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. भारतातील शीख समुदायाशी माझे खूप चांगले संबंध आहेत.

अमित मालवीय यांची टीका
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींवर टीका केली आहे. X वरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, एका तरुण विद्यार्थ्याने राहुल गांधींना म्हटले की, तुम्ही शिखांशी चांगले वागला नाही . आता राहुल गांधी केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही टीकेला सामोरे जात आहेत.

Web Title: Rahul Gandhi on Sikh Riots: 'What happened then was very wrong', Rahul Gandhi's big statement on the 1984 Sikh riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.