मी राहुल गांधींना नेता मानत नाही - हंसराज भारद्वाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 16:48 IST2018-11-15T16:45:04+5:302018-11-15T16:48:53+5:30

राहुल गांधी सध्या शिकत आहेत. त्यांना मी नेता मानत नाही, असे हंसराज भारद्वाज यांनी म्हटले. 

Rahul Gandhi not a leader, he is still learning, says Congress veteran Hansraj Bhardwaj | मी राहुल गांधींना नेता मानत नाही - हंसराज भारद्वाज 

मी राहुल गांधींना नेता मानत नाही - हंसराज भारद्वाज 

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी सध्या शिकत आहेत. त्यांना मी नेता मानत नाही, असे हंसराज भारद्वाज यांनी म्हटले. 

एएनआयच्या माहितीनुसार, मी राहुल गांधींना नेता मानत नाही. अद्याप त्यांना कोणतेही पद मिळाले नाही. जेव्हा पद मिळेल तेव्हा समजेल. सध्या ते शिकत आहेत. ज्यावेळी त्यांना देशातील जनता स्वीकारेल. तेव्हा ते नेता बनतील, असे हंसराज भारद्वाज यांनी म्हटले आहे. 




याचबरोबर, इंदिरा गांधी किंवा जवाहरलाल नेहरु यांनी कधीच धर्माचे राजकारण केले नाही. मात्र, राहुल गांधी मंदिरांमध्ये जात आहेत. त्यामुळे धर्माचे राजकारण होत असून यामुळे काँग्रेसला अपयश येत असल्याचेही हंसराज भारद्वाज यांनी म्हटले आहे. 

Web Title: Rahul Gandhi not a leader, he is still learning, says Congress veteran Hansraj Bhardwaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.