शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 12:53 PM

'काँग्रेस पक्षाला 'ग्रँड ओल्ड पार्टी' म्हटलं जातं. मात्र आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे. त्यासाठी तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं आणि प्रेमाचं राजकारण करु', असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे

नवी दिल्ली - काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे असा निर्धार काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. 'काँग्रेस पक्षाला 'ग्रँड ओल्ड पार्टी' म्हटलं जातं. मात्र आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे. त्यासाठी तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं आणि प्रेमाचं राजकारण करु', असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.  राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारली आहेत. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

अध्यक्षपद स्विकारल्यानंतर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. 'एकदा आग लागल्यावर ती विझवणं फार कठीण, भाजपाचे लोक संपुर्ण देशात आग आणि हिंसा पसरवत आहेत. ही हिंसा रोखण्याती ताकद फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. ते आग लावतात आपण विझवतो. ते तोडतात आपण जोडतो. ते रागावतात आपण हसतो हाच नेमका फरक आहे', असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

'राजकारण जनतेसाठी आहे, पण आज राजकारणाचा उपयोग जनतेसाठी नाही, त्यांच्या विकासासाठी नाही तर त्यांना चिरडण्यासाठी होतो', असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. 

'भाजपशी मतभेद जरी असले, तरी भाजप कार्यकर्त्यांना आपण भाऊ किंवा बहीणच मानतो. ते आवाज दाबतात पण आपण आवाज उठवू. ते प्रतिमा मलिन करतात तर आणि आदर करतो', असे राहुल गांधींनी म्हटले.

 

राहुल गांधी काँग्रसचे अठरावे तर गांधी घराण्यातील सहावे अध्यक्षराहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग 19 वर्ष पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घराण्यातील मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दोन वेळा अध्यक्षपदाची धूरा सांभाळली होती. राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणारे घरातील सहावे अध्यक्ष असतील.

स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी1) आचार्य कृपलानी – 19472) पट्टाभी सितारामय्या – 1948-493) पुरुषोत्तमदास टंडन – 19504) जवाहरलाल नेहरु – 1951-545) यू. एन. धेबर – 1955-596) इंदिरा गांधी – 19597) नीलम संजीव रेड्डी – 1960–638) के. कामराज – 1964–679) निजलिंगअप्पा – 196810) जगजीवनराम – 1970–7111) शंकर दयाळ शर्मा – 1972–7412) देवकांत बरुआ – 1975-7713) इंदिरा गांधी – 1978–8414) राजीव गांधी – 1985–9115) पी. व्ही नरसिंहराव – 1992–9616) सिताराम केसरी – 1996–9817) सोनिया गांधी – 1998 ते 201718) राहुल गांधी - 2017 पासून 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंग