शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

राहुल गांधी माजी पंतप्रधानंचे पुत्र-नातू आणि पणतू, याशिवाय काहीच नाही; रविशंकर प्रसादांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 4:41 PM

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद अनेकदा काँग्रेसवर जहरी टीका करताना आढळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी राहुल गांधींसहकाँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. टीव्ही-9 हिंदी वृत्तवाहिनीशी बातचीतमध्ये रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवरील संसदीय समितीची कारवाई असो किंवा त्यांना दोन वर्षांची शिक्षा असो, सर्वच विषयांवर भाष्य केले आणि त्या विषयांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली.

तुम्ही राहुल गांधींना घाबरता?यावेळी प्रसाद म्हणाले, राहुल गांधी एका माजी पंतप्रधानाचे पुत्र, आणखी एका पंतप्रधानाचे नातू आणि पणतू आहे. त्यांनी थोडे वाचन-लेखन करावे आणि गृहपाठ करावा. राहुल गांधींना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस कोणाला नेता बनवतो, हा त्यांचा विषय आहे. यावर मी एवढेच म्हणू शकतो की राहुल गांधी आमच्यासाठी गुड न्यूज आहेत.

राहुल सुरतला गेल्यामुळे तुम्ही का चिडला?या प्रश्नावर रविशंकर म्हणतात, प्रश्न धोरणात्मक कारवाईचा आहे. तुम्हाला शिक्षा झाली, त्याविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. पण, तीन मुख्यमंत्र्यांसह सुरतला जायची गरज होती का? हा काही मेळावा नव्हता. तीन मुख्यमंत्री आपले काम सोडून जिल्हा न्यायाधीशांकडे जात असल्याचे देशात प्रथमच घडत आहे. तुमचा पक्ष एक आहे, हा संदेश राहुल गांधींना द्यायचा असेल, तर त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. न्यायालयात दाखविण्याची काय गरज आहे. हे अत्यंत अलोकतांत्रिक आणि कायद्याच्या विरोधात होते.

राहुल गांधींवरील कारवाईवर...यापूर्वी भाजप नेत्यांवर अशी कोणतीही कारवाई झाली नाही असे नाही. आतापर्यंत 32 जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भाजपच्या 6 लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. लिली थॉमस प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की, कोणत्याही लोकप्रतिनिधीला 2 वर्षांची आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 1 महिन्याची शिक्षा होताच तुमचे सदस्यत्व रद्द केले जाईल. हे थांबवण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या सरकारने अध्यादेश काढला होता. पण, राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडून फेकून दिला, असे प्रसाद म्हणाले.

राहुल गांधी विदेशात जाऊन बदनामी करतातराहुल परदेशात म्हणाले होते की, भारतात लोकशाही कमकुवत होत आहे, आणि अमेरिका आणि युरोपीय देश काहीच करत नाहीत. राहुल गांधींचा नुकताच ईशान्येत पराभव झाला. जनतेने त्यांना मत दिले नाही. जर राहुल गांधींना मते मिळाली नाहीत म्हणून, लंडनमध्ये जाऊन राग काढू नका, लोकशाहीला दोष देऊ नका, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद