शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी बेजबाबदार, TMC खासदाराने माफी मागावी; जाट समाजाचे जगदीप धनखड यांना समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 14:49 IST

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्यामुळे राजकारण तापले आहे.

Loksabha MP Suspension Mimicry of Dhankhar ( Marathi News ) : राज्यसभा सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (jagdeep dhankhar) यांच्या 'मिमिक्री' प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपपाठोपाठ जाट समाजही धनखर यांच्या समर्थनार्थ उतरला आहे. मिमिक्री करणारे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी(Kalyan Banerjee) यांनी माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बुधवारी जाट समाजाने जगदीप धनखड यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली.

पालम खापचे प्रमुख चौधरी सुरेंद्र सोलंकी म्हणाले, एका शेतकरी समाजाचा अपमान झाल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. टीएमसी नेते कल्याण बॅनर्जी यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखड आणि देशभरातील लाखो शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही आजच मोठी बैठक बोलवू आणि टीएमसीविरोधात आंदोलन करू. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे या प्रकरणात नाव पुढे येणे, अत्यंत दुर्दैवी आहे. उद्या भाजप देशभरात आंदोलन करणार आहे

दरम्यान, जगदीप धनखड यांच्या अपमानाविरोधात भाजप गुरुवारी देशभरात आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेत राहुल गांधी यांचा पुतळाही दहन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिलाय.

'उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही'संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी संसदेत बोलताना म्हणाले की, मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. हे लोक घटनात्मक पदावर असलेल्या लोकांचा अपमान करतात. आधी पंतप्रधानांचा अपमान करायचे, कारण ते गरीब पार्श्वभूमीतून आलेले आहेत. तुमचाही अपमान केला, कारण तुम्ही शेतकरी पार्श्वभूमीचे आहात. भारत देश उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही. 

'माझ्या जातीचा अपमान केला'दरम्यान, जगदीप धनखड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मला माझी चिंता नाही, हे मी सहन करू शकतो. मात्र खुर्चीचा अनादर मी खपवून घेणार नाही. या खुर्चीची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी माझी आहे. माझी जात, माझी पार्श्वभूमी, या खुर्चीचा अपमान झाला आहे.

'कल्याण बॅनर्जी काय म्हणाले?'माफी मागण्याबाबत खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, धनखडजींबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. ते आमचे माजी राज्यपाल राहिले आहेत. ते आपले उपराष्ट्रपती आहेत. मिमिक्री ही एक प्रकारची कला आहे, जी मी दाखवून दिली. अलीकडेच पंतप्रधानांनी लोकसभेतही मिमिक्री केली होती. त्यावेळी सर्वांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. माफी मागण्याचा प्रश्नच नाही.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीtmcठाणे महापालिका