शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राहुल गांधी खोटे हिंदू, केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 1:51 PM

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आजकाल खोटे हिंदुत्ववादी जन्म घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. राहुल यांच्या कर्नाटक दौऱ्यामुळे लोकांचं चांगलंच मनोरंजन होत असल्याचं म्हणत अनंतर हेगडे यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी बुधवारी कर्नाटक दौऱ्याचा आपला पहिला टप्पा ...

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आजकाल खोटे हिंदुत्ववादी जन्म घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. राहुल यांच्या कर्नाटक दौऱ्यामुळे लोकांचं चांगलंच मनोरंजन होत असल्याचं म्हणत अनंतर हेगडे यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी बुधवारी कर्नाटक दौऱ्याचा आपला पहिला टप्पा पूर्ण केला. उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे माध्यमांशी बोलताना अनंत हेगडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

अनंत हेगडे यांनी म्हंटलं की, राहुल गांधी जितके वेळा कर्नाटकमध्ये येतील, तितकं चांगलं आहे. याच कारण म्हणजे कर्नाटकातील लोकांचं चांगलं मनोरंजन होईल. याशिवाय कर्नाटक भाजपाला यामुळे मजबूत होण्याची संधी मिळेल. कर्नाटकातील लोकांना आणखी मनोरंजन कार्यक्रमाची अपेक्षा आहे. आज खोटा हिंदूवादी नेता जन्म घेत आहे. मला आनंद आहे की, राष्ट्रवादाला विसरत आहेत. बनावट राष्ट्रवाद यालाच म्हणतात का, असा सवाल करत सिद्धरामय्या आणि राहुल यांनी किमान हे लक्षात ठेवलं आहे की ते हिंदू आहेत.

हिंदूत्व किंवा राष्ट्रवादावर फक्त चर्चा करणं पुरेसं नाही. त्याची अंमलबजावणी करा, तेव्हाच तुमचा सन्मान होईल, असं अनंत हेगडे यांनी म्हंटलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुजरात निवडणुकीत आणि कर्नाटकमध्ये झालेल्या सभांवेळी मंदिरांना भेटी दिल्या. या दौऱ्यांवरून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAnanth hegdeअनंत हेगडेcongressकाँग्रेसBJPभाजपा