शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

नो मिन्स नो; अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:09 PM

51 खासदारांनी आग्रह करुनही राहुल राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली: यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची बैठक झाली. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या 51 खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र राहुल यांनी अध्यक्षपदी राहण्यास नकार दिला. राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावं, अशी मागणी खासदारांनी केली. लोकसभा निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचं काँग्रेस खासदार शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी म्हटलं. त्यावर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचं राहुल म्हणाले. यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या सर्व 51 खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र राहुल राजीनाम्यावर ठाम राहिले. युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला. राहुल यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक झाली होती. त्यामध्ये राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर तुम्हाला पर्याय असू शकत नाही, असं मत व्यक्त करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस