Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:31 IST2025-08-28T13:29:09+5:302025-08-28T13:31:37+5:30
Rahul Gandhi Bihar Yatra: भाजपने याबद्दल राहुल गांधींना माफी मागण्याची मागणी केली आहे.

Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
Rahul Gandhi Bihar Yatra: 'मत चोरी' आणि SIR च्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव 'मतदान अधिकार यात्रे'च्या निमित्ताने बिहारचा दौरा करत आहेत. आपल्या भाषणांमधून राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर मत चोरीचा आरोप करत आहेत. अशातच, दरभंगा येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात पीएम मोदींना आईच्या नावाने शिव्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
युथ काँग्रेसच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राहुल गांधींचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदींना आईच्या नावाने शिव्या देताना दिसत आहेत. हा कार्यक्रम युवक काँग्रेसच्या मोहम्मद नौशादने आयोजित केला होता. दरम्यान, पंतप्रधानांसाठी अपशब्द वापरल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर पलटवार केला आहे.
#SHAMEFUL | Congress and RJD leaders in Darbhanga, Bihar, hurled abuses at PM Narendra Modi’s mother from the stage of the Mahagathbandhan rally. pic.twitter.com/f44RxgmGS4
— Organiser Weekly (@eOrganiser) August 28, 2025
उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणाले की, राहुल गांधींच्या मंचावरुन मोदींना अपशब्द वापरण्यात आला. अशा प्रकारची भाषा सहन करण्यायोग्य नाही. काँग्रेस आणि राजद बिहारमधील वातावरण बिघडवू इच्छितात. पीएम मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तेजस्वी आणि राहुल यांनी याबद्दल माफी मागावी.
यात्रेतून राहुल गांधींचा भाजपवर मत चोरीचा आरोप
राहुल गांधींनी आज सीतामढीमधून पंतप्रधान मोदींवर मत चोरीचा आरोप केला. जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की, भाजपवाले बिहारमधील निवडणुका चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक आधी तुमचे मत घेतील, नंतर तुमचे रेशन कार्ड घेतील आणि नंतर आधारही घेतील. म्हणूनच आम्ही मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे. निवडणूक आयुक्तांना हे माहित असले पाहिजे की, बिहारमधील लोक हुशार आहेत आणि एकही मत चोरू देणार नाहीत.