‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:57 IST2025-09-01T15:55:27+5:302025-09-01T15:57:43+5:30
Rahul Gandhi Bihar: 'भाजपवाले तुमची जमीन, तुमचे रेशन कार्ड, सर्व काही हिसकावून घेतील आणि अदानी-अंबानींना देतील.'

‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
Rahul Gandhi Bihar: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या 'मतदार हक्क' यात्रेच्या समारोपाच्या रॅलीतून भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'जेव्हा आम्ही महादेवपुरा येथे मत चोरीचे सत्य उघड केले, तेव्हा आम्ही अणुबॉम्ब टाकला. पण, आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे. हायड्रोजन बॉम्बनंतर नरेंद्र मोदी या देशाला आपला चेहरा दाखवू शकणार नाहीत.'
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या मतदार हक्क यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. राहुल गांधी यांनी समारोपाच्या रॅलीतून पुन्हा एकदा भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राहुल म्हणाले की, 'ही यात्रा बिहारमध्ये सुरू झाली, आम्ही त्याला मतदार हक्क यात्रा असे नाव दिले. तिकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणुका चोरीला गेल्या. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत सुमारे १ कोटी नवीन मतदार जोडले गेले. आमच्या आघाडीला लोकसभेत जे काही मते मिळाली, तीच मते आम्हाला विधानसभेत मिळाली. मात्र, सर्व नवीन मते भाजपच्या खात्यात गेली. आम्ही लोकसभा जिंकलो पण विधानसभेत आमचे तिन्ही बलाढ्य पक्ष संपले.'
'वोट चोरी' का मतलब 👇
— Congress (@INCIndia) September 1, 2025
⦁ अधिकार की चोरी
⦁ आरक्षण की चोरी
⦁ रोजगार की चोरी
⦁ शिक्षा की चोरी
⦁ लोकतंत्र की चोरी
⦁ युवाओं के भविष्य की चोरी
: 'वोटर अधिकार यात्रा' में नेता विपक्ष श्री @RahulGandhi
📍पटना, बिहार pic.twitter.com/UvRHtmquvx
राहुल पुढे म्हणाले, 'निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मते चोरली. कर्नाटकातील महादेवपुरातील एका भागात १ लाखाहून अधिक बनावट मतदार असल्याचे आम्ही उघड केले. मात्र, निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी, व्हिडिओग्राफी देत नाही. ही मत चोरी म्हणजे अधिकारांची चोरी, मत चोरी म्हणजे आरक्षणाची चोरी, मत चोरी म्हणजे रोजगाराची चोरी, मत चोरी म्हणजे शिक्षणाची चोरी, मत चोरी म्हणजे लोकशाहीची चोरी, मत चोरी म्हणजे तरुणांच्या भविष्याची चोरी. ते फक्त मते घेत नाहीत, तर ते तुमची जमीन, तुमचे रेशन कार्ड, सर्व काही हिसकावून घेतील आणि अदानी-अंबानींना देतील.'
BJP के लोग अच्छी तरह सुन लें 👇
— Congress (@INCIndia) September 1, 2025
⦁ आपने 'वोट चोरी' का 'एटम बम' देख लिया
⦁ अब 'वोट चोरी' का 'हाइड्रोजन बम' आने वाला है
: 'वोटर अधिकार यात्रा' में नेता विपक्ष श्री @RahulGandhi
📍पटना, बिहार pic.twitter.com/HFIRdw5uBA
'ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारले, त्याच शक्ती या संविधानाला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही त्यांना संविधान मारू देणार नाही. म्हणूनच आम्ही बिहारमध्ये यात्रा काढली. बिहारमधील सर्व तरुण या प्रवासात जोडले गेले. आता भाजपने ही महत्त्वाची गोष्ट ऐकली पाहिजे. तुम्ही अणुबॉम्बचे नाव ऐकले आहे, त्यापेक्षा मोठा हायड्रोजन बॉम्ब आहे. आम्ही महादेवपुरात अणुबॉम्ब टाकला होता, आता भाजपवाल्यांवर हायड्रोजन बॉम्ब येत आहे. संपूर्ण देशाला मत चोरीचे सत्य कळणार आहे. हायड्रोजन बॉम्ब नंतर मोदीजी या देशाला तोंड दाखवू शकणार नाहीत,' अशी बोचरी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.