राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 15:31 IST2025-08-24T15:29:24+5:302025-08-24T15:31:59+5:30
Rahul Gandhi Bihar : राहुल गांधींच्या बिहारमधील यात्रेत एका तरुणाने त्यांना मिठी मारुन किस घेतल्याचा प्रकार घडला आहे.

राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
Rahul Gandhi Bihar :बिहारमध्येराहुल गांधींच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान सुरक्षेत मोठी चूक समोर आली आहे. अररियामध्ये राहुल गांधी बाईकवरुन जात असताना एका तरुणाने सुरक्षा घेरा तोडला आणि राहुल गांधींना मिठी मारून चुंबन घेतले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या तरुणाला बाजूला खेचले आणि चापटही मारली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेद्वारे राज्याचा दौरा करत आहेत. त्यांच्यासोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांसह राजदचे तेजस्वी यादव देखील उपस्थित आहेत. आज, २४ ऑगस्ट रोजी राहुल गांधी बाईकवरुन अररियाच्या दिशेने निघाले असता, एक तरुण सुरक्षा घेरा तोडून राहुल गांधींच्या जवळ पोहोचला आणि त्यांना मिठी मारुन चुंबन घेतले. यादरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्याने त्या तरुणाला चापट मारुन पळवून लावले.
🚨 Shame Alert 🚨
— Amock Ka Baap parody (@Amock_ka_baap) August 24, 2025
After Licking for years finally My LGBTQ+ son Amock manage to Kiss Rahul Gandhi!🏳️🌈🔥
Shame on Rahul Gandhi's security guard who has sl@pped my gay son Amock🤣 pic.twitter.com/DhZBjf6OqJ
या घटनेनंतर सर्व सुरक्षा कर्मचारी सक्रिय झाले. त्यांनी राहुल गांधींकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकांना हाकलून लावले. सध्या हा चुंबनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राहुल गांधींची मतदाह हक्क यात्रा
राहुल गाांधींची यात्रा रविवारी अररियाला पोहोचली. येथून राहुल गांधी संध्याकाळी दिल्लीला रवाना होतील. मंगळवारी प्रियंका गांधी वाड्रा या यात्रेत सामील होणार आहेत. राहुल गांधींच्या या यात्रेचा आज आठवा दिवस आहे. त्यांच्यासोबत तेजस्वी यादव, मुकेश साहनी, सीपीआय (एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेदेखली आहेत.