मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:42 IST2025-08-28T12:41:24+5:302025-08-28T12:42:41+5:30

Rahul Gandhi Bihar: 'भाजप तुमच्याकडून अधिकार हिसकावून घेऊ इच्छिते. ६५ लाख मते कापली गेली. त्यात एकाही श्रीमंत माणसाचे नाव नाही.'

Rahul Gandhi Bihar: After the elections, they will take away ration and Aadhaar..; Rahul Gandhi attacks Modi government | मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi Bihar: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीच्या मतदार हक्क यात्रेतून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव सातत्याने केंद्रातील भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. आज(दि.२८) त्यांनी सीतामढी येथे जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचे गंभीर आरोप केले. 

तुमचे रेशन कार्ड घेतील...
जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की, भाजपवाले बिहारमधील निवडणुका चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक आधी तुमचे मत घेतील, नंतर तुमचे रेशन कार्ड घेतील आणि नंतर आधारही घेतील. म्हणूनच आम्ही मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे. निवडणूक आयुक्तांना हे माहित असले पाहिजे की, बिहारमधील लोक हुशार आहेत आणि एकही मत चोरू देणार नाहीत.

तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न...
राहुल पुढे म्हणतात, मी दलित बांधवांना सांगू इच्छितो की, स्वातंत्र्यापूर्वी तुमची काय अवस्था होती ते आठवा? तुम्हाला मारहाण झाली, तुम्हाला अस्पृश्य म्हटले गेले. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले. भाजप तुमच्याकडून अधिकार हिसकावून घेऊ इच्छिते. ६५ लाख मते कापली गेली. त्यात एकाही श्रीमंत माणसाचे नाव नाही. ते गरिबांची मते चोरत आहेत. ते तुमचा आवाज दाबू इच्छितात. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. तुमचा आवाज त्यांना दाबू देणार नाहीत. 

भाजप-आरएसएस मत चोर...
तुम्ही या यात्रेत तुमची सर्व शक्ती पणाला लावली आहे. लहान मुले येत आहेत, माझ्या कानात कुजबुजत आहेत की, नरेंद्र मोदी मते चोरतात. कर्नाटकमध्ये आम्ही भाजपने मते चोरल्याचे पुरावे दाखवले. आतापर्यंत मी फक्त कर्नाटकचा पुरावा दिला आहे. येणाऱ्या काळात मी लोकसभा निवडणुका आणि हरियाणा निवडणुकीचे पुरावे देईन. आम्ही हे सिद्ध करू की, भाजप आणि आरएसएस मते चोरुन निवडणुका जिंकतात, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

नरेंद्र मोदी राजेशाही स्थापित करू इच्छितात: तेजस्वी यादव
जाहीर सभेला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले, नितीश कुमार, जे सतत त्यांची भूमिका बदलतात, ते बिहारवर राज्य करण्याच्या स्थितीत नाहीत. बिहारच्या लोकांना रोजगार आणि नोकऱ्यांची गरज आहे. बिहार लोकशाहीचे जन्मस्थान आहे. भाजप आणि त्यांचे सहयोगी, निवडणूक आयोग या भूमीतून लोकशाही संपवू इच्छितात. ते केवळ तुमचा मतदानाचा अधिकारच नाही, तर तुमचे अस्तित्वही संपवू इच्छितात. नरेंद्र मोदीजी लोकशाही नष्ट करून 'राजेशाही' स्थापित करू इच्छितात, अशी टीका त्यांनी केला.

Web Title: Rahul Gandhi Bihar: After the elections, they will take away ration and Aadhaar..; Rahul Gandhi attacks Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.