शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

"ना चाचण्या, ना व्हेंटिलेटर्स, लसही नाही, फक्त उत्सवाचं ढोंग"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 13:05 IST

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांनाही रुग्णालयात बेड्स किंवा ऑक्सिजन मिळत नसल्यानं त्रास सहन करावा लागत आहे. 

ठळक मुद्देदेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांनाही रुग्णालयात बेड्स किंवा ऑक्सिजन मिळत नसल्यानं त्रास सहन करावा लागत आहे. 

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल १३ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत देशात २ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. देशात अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "ना चाचण्या आहेत, ना हॉस्पीटलमध्ये बेड. ना व्हेंटिलेटर आहेत, ना ऑक्सिजन, लसीही उपलब्ध नाही. केवळ उत्सवाचं ढोंग सुरू आहे. PMCares?," असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली आहे. 

चोवीस तांसात विक्रमी रुग्णवाढदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल एक कोटीच्या वर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,००,७३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १,४०,७४,५६४  पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७३ हजारांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानhospitalहॉस्पिटल