"ना चाचण्या, ना व्हेंटिलेटर्स, लसही नाही, फक्त उत्सवाचं ढोंग"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 01:02 PM2021-04-15T13:02:34+5:302021-04-15T13:05:09+5:30

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांनाही रुग्णालयात बेड्स किंवा ऑक्सिजन मिळत नसल्यानं त्रास सहन करावा लागत आहे. 

rahul gandhi attacks pm narendra modi on coronavirus cases india hospital beds vaccination | "ना चाचण्या, ना व्हेंटिलेटर्स, लसही नाही, फक्त उत्सवाचं ढोंग"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

"ना चाचण्या, ना व्हेंटिलेटर्स, लसही नाही, फक्त उत्सवाचं ढोंग"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

Next
ठळक मुद्देदेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांनाही रुग्णालयात बेड्स किंवा ऑक्सिजन मिळत नसल्यानं त्रास सहन करावा लागत आहे. 

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल १३ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत देशात २ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. देशात अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

"ना चाचण्या आहेत, ना हॉस्पीटलमध्ये बेड. ना व्हेंटिलेटर आहेत, ना ऑक्सिजन, लसीही उपलब्ध नाही. केवळ उत्सवाचं ढोंग सुरू आहे. PMCares?," असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली आहे. 



चोवीस तांसात विक्रमी रुग्णवाढ

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल एक कोटीच्या वर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,००,७३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १,४०,७४,५६४  पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७३ हजारांवर पोहोचला आहे. 

Web Title: rahul gandhi attacks pm narendra modi on coronavirus cases india hospital beds vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.