मानहानीप्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर; जबाब नोंदवला : पुढील सुनावणी ९ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 09:07 IST2026-02-21T09:06:57+5:302026-02-21T09:07:29+5:30

पुढील सुनावणीवेळी राहुल गांधींना त्यांच्या बचावासाठी पुरावे सादर करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी राहुल गांधी न्यायालयात दाखल झाले.

Rahul Gandhi appears in court in defamation case; records statement: Next hearing on March 9 | मानहानीप्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर; जबाब नोंदवला : पुढील सुनावणी ९ मार्चला

मानहानीप्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर; जबाब नोंदवला : पुढील सुनावणी ९ मार्चला

लखनौ : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सुलतानपूर न्यायालयात जबाब नोंदवला. २०१८ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित मानहानीप्रकरणी त्यांनी हा जबाब नोंदवला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पुढील सुनावणीवेळी राहुल गांधींना त्यांच्या बचावासाठी पुरावे सादर करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी राहुल गांधी न्यायालयात दाखल झाले. जबाब नोंदवल्यानंतर सव्वाअकरा वाजता ते कोर्टातून बाहेर पडले. गांधी न्यायालयात दाखल झाल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांनी व काँग्रेस कार्यकत्यांनी कोर्टाबाहेर गर्दी केली होती. ते न्यायालयातून बाहेर पडताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. त्यानंतर गांधींनी स्मितहास्य करत हात हलवून समर्थकांना अभिवादन केले.

ट्रम्पच्या नव्या आदेशामुळे कायदेशीर निर्वासितांवर अटकेची टांगती तलवार; अमेरिकेत ग्रीन कार्डवर राहणाऱ्या दोन लाख निर्वासितांमध्ये पुन्हा परत मायदेशी पाठवण्याची भीती

काय आहे प्रकरण?

२०१८ मध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांत राहुल गांधींनी तत्कालीन भाजप अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

याप्रकरणी सुलतानपूर येथील भाजप कार्यकर्ते  विजय मिश्रा यांनी गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गत पाच वर्षांपासून या प्रकरणावर सुलतानपूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

‘सध्याच्या काळातील असे खटले म्हणजे सन्मानच’

सध्याचे देशातील राजकीय वातावरण पाहता अशा प्रकारच्या सर्वाधिक खटल्यांना तोंड देणे ही सन्मानाची बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या खासदार व महासचिव प्रियांका गांधी यांनी आसामच्या दौऱ्यात केले.

जे लोक सत्य, विकास आणि जनतेसाठी उभे राहतात, त्यांच्यावरच सर्वाधिक हल्ले होतात. एवढेच नाही तर सर्वाधिक खटले, ईडी व आयकर विभागाच्या कारवायादेखील त्यांच्यावरच होतात, असे त्या म्हणाल्या.

Web Title : मानहानि मामले में राहुल गांधी अदालत में पेश; अगली सुनवाई 9 मार्च को

Web Summary : राहुल गांधी अमित शाह पर टिप्पणी से जुड़े 2018 के मानहानि मामले में सुल्तानपुर अदालत में पेश हुए। उन्होंने अपना बयान दर्ज कराया, अगली सुनवाई 9 मार्च को है। उन्होंने अदालत के बाहर समर्थकों का अभिवादन किया।

Web Title : Rahul Gandhi appears in court for defamation case; next hearing March 9

Web Summary : Rahul Gandhi appeared in Sultanpur court in a 2018 defamation case linked to comments about Amit Shah. He recorded his statement, and the next hearing is set for March 9. He greeted supporters outside the court.