विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सरकारच्या इशाऱ्यावर आपल्याला सभागृहात बोलण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांच्यावर केला. लोकशाहीवरील हा काळा डाग असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले.
विरोधी पक्षनेता व प्रत्येक सदस्याला सभागृहात बोलण्याचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेचे अभिन्न अंग आहे. मात्र, त्या मतस्वातंत्र्याकडेच दुर्लक्ष होत असल्याने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होता आणि विरोधी पक्षनेता म्हणून मला राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर बोलण्यापासून जाणूनबुजून रोखले जात आहे, हे गंभीर आहे. विरोधी पक्षाच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करणे ही लोकसभेच्या अध्यक्षांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.
Web Summary : Rahul Gandhi accuses the government of suppressing his voice in Parliament. He claims he was deliberately prevented from speaking on national security during the President's address, calling it a blow to democracy and urging the Speaker to protect opposition rights.
Web Summary : राहुल गांधी ने सरकार पर संसद में अपनी आवाज दबाने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि राष्ट्रपति के अभिभाषण के दौरान उन्हें राष्ट्रीय सुरक्षा पर बोलने से जानबूझकर रोका गया, जिसे उन्होंने लोकतंत्र पर आघात बताया और अध्यक्ष से विपक्ष के अधिकारों की रक्षा करने का आग्रह किया।