शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'हाय प्रोफाईल' कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती- राजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 11:42 IST

रघुराम यांच्या निवेदनानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली

नवी दिल्ली: बुडीत खात्यात गेलेल्या कर्जावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलेल्या निवेदनावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कर्जबुडव्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाला दिली होती. मात्र त्यावर काय कारवाई झाली, याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही, असं राजन यांनी म्हटलं आहे. बँकांच्या बुडीत खात्यात गेलेल्या कर्जांबद्दल लोकसभेच्या समिक्षा समितीनं राजन यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं होतं. देशातील अनेक बँकांची कर्जे बुडीत खात्यात गेली आहेत. त्यामुळे बँका संकटात सापडल्या आहेत. याबद्दल रघुराम राजन यांनी सविस्तर निवेदन दिलं. 'हाय प्रोफाईल' कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती. मात्र त्या यादीचं पुढे काय झालं, सरकारनं काय कारवाई केली, याची माहिती माझ्याकडे नाही, असं राजन म्हणाले. मात्र राजन यांनी पीएमओबद्दल अधिक भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ते मोदी यांच्या पीएमओबद्दल बोलत आहेत की मनमोहन सिंग यांच्या पीएमओबद्दल याबद्दल स्पष्टता नाही. मात्र यावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. रघुराम राजन यांनी बुडीत खात्यातील कर्जांबद्दल यूपीए सरकारला थेट जबाबदार धरलेलं नाही. मात्र त्यांनी मोदी सरकारलाही क्लिन चीट दिलेली नाही. मोदी सरकारच्या अनेक योजनांमुळे बुडीत खात्यात गेलेलं कर्ज वाढलं, अशा स्पष्ट शब्दांमध्ये राजन यांनी त्यांच्या बाजू मांडली. यानंतर काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली. राजन यांच्या निवेदनानंतर काँग्रेसनं वर्तमानपत्रांची कात्रणं दाखवून भाजपावर शरसंधान साधलं आहे. तर काँग्रेसमुळेच बँका गाळ्यात गेल्या, असे आरोप भाजपानं सुरू केले आहेत.  

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा