शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

‘राफेल फेरविचार याचिकेमुळे देशाची सुरक्षा धोक्यात’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:33 AM

फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे दिसत नाही, अशी ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी याचिकाकर्त्यांनी केलल्या याचिकेत अनाधिकार मिळविलेल्या गोपनीय दस्तावेजांचा उपयोग केला गेल्याने देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे, असा दावा केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

नवी दिल्ली : फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे दिसत नाही, अशी ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी याचिकाकर्त्यांनी केलल्या याचिकेत अनाधिकार मिळविलेल्या गोपनीय दस्तावेजांचा उपयोग केला गेल्याने देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे, असा दावा केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.या फेरविचार याचिकांच्या उत्तरादाखल संरक्षण मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात हा दावा करून असे नमूद करण्यात आले की, याचिकाकर्त्यांनी त्यांच्या अर्जासोबत जोडलेले दस्तावेज मूळ दस्तावेजांच्या छायाप्रती असल्या तरी ते देशाच्या संरक्षेसंबंधीची गोपनीय दस्तावेज आहेत. त्यांचा याचिकेत वापर केल्याने आता ते दस्तावेज जगजाहीर झाले आहेत. यामुळे भारताची युधसज्जता व त्यासाठी घेण्यात येत असलेल्या लढाऊ विमानांचा तपशील शत्रूलाही सहजपणे उपलब्ध होईल. या सर्वाचा परिणाम म्हणून देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे.युक्तिवादाच्या वेळी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी केलेल्या प्रतिपादनाचे समर्थन करत संरक्षण मंत्रालय म्हणते की, सरकारी फायलींमधील गोपनीय दस्तावेजांच्या अनाधिकारपणे छायाप्रती काढून त्यांचा वापर याचिकेसाठी करणे हेही दंड विधानानुसार चोरीच्याच व्याख्येत बसते. शिवाय हा गोपनीयता कायद्याचा भंग असण्याकेरीज राफेल कराराचेही उल्लंघन आहे.याचिका फेटाळाव्यातसंरक्षण मंत्रालय असेही म्हणते की, भारतीय साक्ष कायद्याच्या कलम १२३ व १२४ नुसार जी न्यायालयातही उघड न करण्याचा विशेषाधिकार सरकार सांगू शकते अशा वर्गात मोडणारे हे दस्तावेज आहेत. त्यामुळे सरकारकडून पूर्वानुमती न घेता त्यांचा कोणताही वापर करण्याचा याचिकाकर्त्यांना कोणताही अधिकार नाही. शिवाय माहिती अधिकार कायद्यान्वयेही असे दस्तावेज उघड करण्यास मज्जाव आहे. हे दस्तावेज मंत्रालयातून बाहेर कशी गेली याचा अंतर्गत तपास सुरू आहे. ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता अशा दस्तावेजांच्या आधारे केलेल्या फेरविचार याचिका तडकाफडकी फेटाळाव्यात, अशी विनंती सरकारने केली आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील