शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मातीची भांडी बनवणाऱ्याला आली १ कोटींची GST नोटीस; संपूर्ण कुटुंब हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:50 IST

मातीची भांडी बनवणाऱ्या मोहम्मद शाहिद यांना चक्क १ कोटी २५ हजार २९७ रुपयांची जीएसटी (GST) नोटीस पाठवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये प्रशासकीय निष्काळजीपणाचं एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मातीची भांडी बनवणाऱ्या मोहम्मद शाहिद यांना चक्क १ कोटी २५ हजार २९७ रुपयांची जीएसटी (GST) नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस मिळाल्यापासून त्यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शाहिद यांना ही नोटीस मिळाली असून ते प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मोहम्मद शाहिद यांना मिळालेल्या नोटिसीनुसार, त्यांची वार्षिक उलाढाल दाखवण्यात आली आहे, जी प्रत्यक्षात शून्य आहे. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावर चालतो. हे फसवणुकीचं प्रकरण असल्याचं मानलं जात आहे. मात्र अशा प्रकारची नोटीस मिळाल्याने प्रशासकीय व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हरचंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुवीरगंज बाजारचे रहिवासी मोहम्मद शाहिद यांचा पिढीजात व्यवसाय कुंभारकाम आहे. ते आणि त्यांचं कुटुंब मातीपासून माठ, मडकी, दिवे आणि खेळणी बनवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा कोणताही मोठा व्यवसाय, भागीदारी किंवा कारखाना नाही. असं असतानाही त्यांना नोटीस मिळाली.  नोटिसीत असा दावा करण्यात आला आहे की, शाहिद यांच्या नावाने बिहारमधील सिवान येथे 'भारत एंटरप्रायझेस' नावाची फर्म जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहे. या फर्मच्या माध्यमातून २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांत कोट्यवधींचा कर थकीत आहे, जो एकूण १,००,२५,२९७ रुपये इतका होतो.

याबाबत बोलताना शाहिद यांनी सांगितलं की, "हे नक्कीच एखादं मोठं कारस्थान आहे. माझी कोणतीही फर्म किंवा मोठा कारखाना नाही. मी तर शिक्षितही नाही. माझ्या पॅन कार्डचा कुणीतरी चुकीचा वापर केला असावा." त्यांनी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या नोटिसीमुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात आहे. या प्रकरणावर स्थानिक जीएसटी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Potter Receives Shocking ₹1 Crore GST Notice, Family Devastated

Web Summary : Uttar Pradesh potter Mohammad Shahid received a ₹1 crore GST notice despite minimal income. A firm, 'Bharat Enterprises,' registered in his name in Bihar, allegedly owes the taxes. Shahid denies any connection, suspecting fraud and seeking investigation. The notice has deeply distressed his family.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशGSTजीएसटीMONEYपैसा