शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गहलोत यांच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अन्य नावांचा विचार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 05:57 IST

कमलनाथ, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, खरगे, कुमारी सैलजा यांच्या नावांची चर्चा 

नवी दिल्ली : राजस्थानमधील आमदारांच्या बंडखोरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी  निवड होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पदासाठी आता कमलनाथ, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, खरगे, कुमार सैलजा आणि अन्य काही नावांचा विचार केला जात आहे. 

कमलनाथ यांनी सांगितले आहे की, अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक नाही. दरम्यान, जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकल्याने मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन हे सोमवारी दिल्लीत परतले. त्यांनी १०, जनपथ येथे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही उपस्थित होते. चर्चेनंतर माकन म्हणाले की, जयपूरमध्ये रविवारी जी बैठक बोलविली होती, ती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सहमतीने बोलविली होती. याबाबतचा अहवाल मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळपर्यंत आम्ही सोपवू. सूत्रांनी सांगितले की, या अहवालाच्या आधारे शिस्तभंगप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या समर्थक असणाऱ्या काही नेत्यांविरुद्ध कारवाईच्या दिशेने पाऊल उचलले जाऊ शकते.

बन्सल यांनी मागविला अर्ज

  • काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवन कुमार बन्सल यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागविला आहे. 
  • बहुधा, ते कुणाचे तरी समर्थन करतील, अशी माहिती पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले. 
  • तर, पक्षाचे नेते शशी थरूर यांनी सांगितले आहे की, ते ३० सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करणार आहेत. 

आम्ही एकनिष्ठ नसतो, तर सरकार पडले असते : जोशीगहलोत समर्थकांनी वेगळी बैठक घेण्याला शिस्तभंग म्हटत आहेत. यावर सरकारचे मुख्य प्रतोद डॉ. महेश जोशी यांनी म्हटले आहे की, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. एकनिष्ठ राहिलो नसतो तर काँग्रेस सरकार केव्हाच पडले असते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस