'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 20:50 IST2025-12-04T20:48:06+5:302025-12-04T20:50:49+5:30
Putin In India : पीएम नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन एकाच कारने पंतप्रधान कार्यालयात पोहोचले.

'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
Putin In India : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनभारतात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान मोदी दिल्लीतील पालम विमानतळावर उपस्थित होते. पुतिन विमानातून खाली उतरताच पीएम मोदींनी आलिंगन देत त्यांचे स्वागत केले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर आणि भारत-अमेरिकेत तणाव सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
मोदी-पुतिन एकाच गाडीतून PM निवासस्थानी
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरुन एकाच गाडीतून PM निवासस्थानी पोहोचले. एकाच कारमधून प्रवास करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. तीन महिन्यांपूर्वी चीनमध्ये झालेल्या शिखर परिषदेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी पुतिन यांच्या कारमधून प्रवास केला होता. पीएम मोदींनी आपल्या एक्स(ट्विटर) अकाउंटवर पुतिन यांच्या स्वागताचे आणि कारमधून एकत्र प्रवास केल्याचे फोटो शेअर केले आहेत.
Delighted to welcome my friend, President Putin to India. Looking forward to our interactions later this evening and tomorrow. India-Russia friendship is a time tested one that has greatly benefitted our people.@KremlinRussia_Epic.twitter.com/L7IORzRfV9
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2025
माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला
“माझा मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात स्वागत करुन मला खूप आनंद होत आहे. आज संध्याकाळी आणि उद्या होणाऱ्या चर्चेबाबत मी उत्सुक आहे. भारत-रशिया मैत्रीने नेहमी दोन्ही देशांच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत,” अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी आपल्या एक्स पोस्टमधून व्यक्त केली. दरम्यान, पीएम मोदींनी पुतिन यांच्यासाठी पंतप्रधान कार्यालयात विशेष डिनरचे आयोजन केले आहे.
रणनीतिक भागीदारीची 25 वर्षे
पुतिन यांचा हा दौरा भारत-रशिया रणनीतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचा ठरतो. 2000 मध्ये पुतिन आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या रणनीतिक भागीदारीला औपचारिक स्वरूप दिले होते.
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
पुतिन यांचा भारत दौरा अनेक कारणांनी महत्त्वाचा :
भू-राजकीय समीकरणे
रशिया-युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचे परदेश दौरे मर्यादित झाले असताना भारताची निवड हा दोन्ही देशांमधील विश्वासाचा महत्त्वाचा संकेत आहे.
भारताची संतुलित विदेशनीती
भारताने रशियासोबत ऊर्जा, संरक्षण आणि व्यापार क्षेत्रात मजबूत संबंध राखले आहेत, तर दुसरीकडे पश्चिम देशांशीही तटस्थ व संतुलित भूमिका निभावली आहे. पुतिन यांचा दौरा या संतुलनाला अधिक बळकटी देऊ शकतो.
संरक्षण क्षेत्रातील सहकार्य
S-400 मिसाइल प्रणाली, जहाजबांधणी, ऊर्जा सहकार्य आणि अणुऊर्जा प्रकल्प या क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या घोषणांची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...