माझं लगीन लावून द्या, शोलेतील वीरूप्रमाणे टॉवरवर चढला तरुण आणि मग तीन तास चालला ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 14:09 IST2021-11-14T14:09:11+5:302021-11-14T14:09:50+5:30
Marriage News: या तरुणाचे वडील हयात नाहीत. त मुलाचे लग्न ठरत नसल्याचे त्याची आई त्रस्त आहे. त्यामुळे हा तरुण असे वेडेवाकडे चाळे करत असतो. हा तरुण मद्यपी आहे, त्यामुळे त्याचे लग्न ठरत नाही आहे. तसेच तो कुठलेही कामही करत नाही.

माझं लगीन लावून द्या, शोलेतील वीरूप्रमाणे टॉवरवर चढला तरुण आणि मग तीन तास चालला ड्रामा
करनाल (हरियाणा) - हरियाणामधील कर्नाल जिल्ह्यातील तरावडी येथे एक तरुण लग्न लावून देण्याची मागणी करत शोलेमधील वीरूप्रमाणे मोबाईल टॉवरवर चढला. या तरुणाचे वय २० वर्षे आहे. आपले लग्न लावून द्यावे, अशी मागणी हा तरुण करत होता. सुमारे ३ तासांपर्यंत या तरुणाचे टॉवरवर शोलेस्टाईल नाटक सुरू होते.
या तरुणाचे वडील हयात नाहीत. त मुलाचे लग्न ठरत नसल्याचे त्याची आई त्रस्त आहे. त्यामुळे हा तरुण असे वेडेवाकडे चाळे करत असतो. हा तरुण मद्यपी आहे, त्यामुळे त्याचे लग्न ठरत नाही आहे. तसेच तो कुठलेही कामही करत नाही. दरम्यान, त्याने टॉवरवर चढून लग्न लावून देण्याची मागणी केल्याने स्थानिक आणि पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, पोलीस आणि आजूबाजूच्या लोकांनी खूप समजूत घालून त्याला खाली उतरवले.
तू जर दारू पिणे सोडले तर पैसे गोळा करून तुझे लग्न लावून दिले जाईल, असे ग्रामस्थांनी सांगून या तरुणाची समजूत घातली. त्यानंतर हा तरुण खाली उतरला. या तरुणाचे नाव अरुण आहे. त्याला खाली उतरवले गेले, तेव्हा तो नशेमध्ये होता. चार तरुणांनी खूप प्रयत्न करून त्याला खाली आणले.
शोलेतील वीरूप्रमाणे हा तरुण १०० फूट उंच टॉवरवर चढला. त्यामुळे कुटुंबीय आणि आसपासच्या लोकांची धावपळ उडाली. या प्रकाराची माहिती पोलिसांनाही दिली गेली. त्याची समजूत काढली गेली. मात्र तो हट्टाने पेटला होता. खूप समजावल्यानंतर तब्बल तीन तासांनी तो खाली उतरला. मात्र मद्यधुंद असल्याने त्याला नीट उतरताही येत नव्हते.
पोलिसांनी लग्नासाठी त्याला संबंधित तरुणीचे नाव विचारले. मात्र तो कुणाचेही नाव सांगू शकला नाही. त्याच्या आईने सांगितले की, तो कायम मद्यधुंद असतो. मद्यपानासाठी त्याने घरातील सामानही विकले आहे.