शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

बाजारभावापेक्षा अधिक दराने धान्याची केली खरेदी, शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घालून व्यापारी फरारी

By बाळकृष्ण परब | Published: December 30, 2020 12:37 PM

Farmer News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी बसले असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भोपाळ - एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी बसले असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यात एका कंपनीने सुमारे २२ शेतकऱ्यांशी धान्याबाबत करार केला. मात्र खरेदीनंतर शेतकऱ्यांना पैसे न देताच संबंधित कंपनी आणि व्यापारी फरार झाले. या शेतकऱ्यांनी मसूर-चण्याच्या धान्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र धान्यखरेदीनंतर शेतकऱ्यांना गंडा घातला.मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यातील देवास येथील २२ शेतकऱ्यांना खोजा ट्रेडर्स या कंपनीसोबत करार केला होता. मात्र खरेदीचे पैसे देण्याची वेळ आली तेव्हा व्यापाऱ्याचा पत्ताच नव्हता. त्रस्त शेतकऱ्यांनी जेव्हा व्यापाऱ्याचा शोध घेतला तेव्हा संबंधित व्यापाऱ्याने तीन महिन्यांच्या आतच आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन संपुष्टात आणल्याचे समोर आले. आता याबाबत खातेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडेही लेखी तक्रार दिली आहे.दरम्यान, आसपासच्या परिसरातील सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांसोबतसुद्धा अशाच प्रकारची घटना घडल्याचा दावा पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित व्यापाऱ्याने दिलेले चेक बाऊन्स झाल्यानंतर आपली फसवणूक झाली असावी अशी शंका शेतकऱ्यांना आली. या खोजा ट्रेडर्स नामक कंपनीने शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा ७०० रुपये अधिक देऊन धान्याची खरेदी केली होती.यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांना पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत सांगितले की, खोजा ट्रेडर्सच्या दोन भावांनी आपले लायसन्स दाखवून आमच्याकडून धान्याची खरेदी केली. मात्र पैसे देण्याचे सांगितले. मात्र पैसे न आल्याने त्यांनी बाजार समितीशी संपर्क साधला. तेव्हा संबंधित व्यापाऱ्यांची नोंदच नसल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांच्या मदतीने या व्यापाऱ्यांचा शोध सुरू आहे, असे देवासच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती