गरज व फायद्यानुसार हव्या त्या देशातून कच्च्या तेलाची खरेदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:44 IST2025-08-09T08:43:53+5:302025-08-09T08:44:53+5:30
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि एचपीसीएलसारख्या सरकारी कंपन्या रशियन तेलाची खरेदी थांबवतील, अशी अटकळ होती. मात्र, एचपीसीएलने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

गरज व फायद्यानुसार हव्या त्या देशातून कच्च्या तेलाची खरेदी!
नवी दिल्ली : रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवावी किंवा थांबवावी, असे कोणतेही निर्देश सरकारकडून मिळालेले नाहीत, असे स्पष्टीकरण हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने दिले आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि एचपीसीएलसारख्या सरकारी कंपन्या रशियन तेलाची खरेदी थांबवतील, अशी अटकळ होती. मात्र, एचपीसीएलने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, अन्य काही सरकारी तेल कंपन्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबरसाठी रशियाव्यतिरिक्त इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी केले आहे.
निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य -
एचपीसीएलच्या अध्यक्षांनी सांगितले की, कंपनी आपल्या व्यावसायिक गरज व फायद्यानुसार निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रशियन तेलाची खरेदी कमी झाली होती.
परंतु यामागे कोणतेही भू-राजकीय कारण नव्हते, तर तो आर्थिक निर्णय होता. जर रशियन तेलाचे दर पुन्हा स्पर्धात्मक झाले, तर कंपनी ते खरेदी करण्यास तयार आहे.