शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

पंजाब पोलिसांना मोठं यश! पाकिस्तानचा कट उधळला; जवानासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 9:50 AM

पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानचा मोठा कट उधळून लावण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी जवानासह तीन जणांना अटक केली आहे. अमृतसर आणि करनाल येथून दोन ड्रोन जप्त करण्यात आले असून एका आरोपीचा सध्या शोध सुरू.

चंदिगड - पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावण्यात पंजाबपोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवानासह तीन जणांना अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरून जीपीएस आधारीत ड्रोनच्या मदतीने अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. 

पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चीनी बनावटीचे दोन ड्रोन, 12 ड्रोन बॅटरी, ड्रोन कंटेनर, इन्सास रायफल काडतूसे, दोन वॉकी-टॉकी सेट, मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थासह सहा लाख 22 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच पत्रकार परिषदेत जप्त करण्यात आलेल्या ड्रोनचे फोटो दाखवण्यात आले आहेत. 

अमृतसर आणि करनाल येथून दोन ड्रोन जप्त करण्यात आले असून सध्या एका आरोपीचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती दिनकर गुप्ता यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका जवानाचा देखील समावेश आहे. राहुल चौहान असं अटक केलेल्या जवानाचं नाव असून तो भारतीय लष्करात नायक हुद्यावर कार्यरत होता. अंमली पदार्थांच्या तस्करीसह पिस्तूल आणि अन्य छोट्या शस्त्रांची तस्करी ड्रोनने झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. राहुल चौहान ड्रोनचा वापर करण्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या प्रकरणात अमृतसरमधील धनोआ कुर्द गावातील धर्मेंद्र सिंग आणि अमृतसर जिल्ह्यातील बालकर सिंग यांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) वडोदरा येथून आयसिसच्या एका दहशतवाद्याला अटक केल्याची घटना समोर आली होती. जफर अली असं मुसक्या आवळलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. जफरला वडोदऱ्यातील गोरवा परिसरातून अटक करण्यात आली. जफर हा तामिळनाडूत वॉन्टेड होता. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जफर वडोदऱ्यात आयसिसच्या मोड्युलचे प्रसार करण्यासाठी आला होता. 

महत्त्वाच्या बातम्या 

Today's Fuel Price : दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

गाई-म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले, उद्यापासून अंमलबजावणी 

CAA : केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू

ट्रक-बसची भीषण टक्कर होऊन लागली आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू, 21 जण जखमी

कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...

 

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिसPakistanपाकिस्तानArrestअटक