Today's Fuel Price petrol price today 11th january 2020 | Today's Fuel Price : दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

Today's Fuel Price : दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे.मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 81.60 रुपये मोजावे लागतील.  दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. शनिवारी (11 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 5 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 81.60 रुपये मोजावे लागतील.  तर डिझेलच्या दरात वाढ 13 पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 72.53 रुपये आहे. सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली असून गेल्या तीन दिवसांत मुंबईत पेट्रोल 27 पैशांनी तर डिझेल 40 पैशांनी महागले आहे. 

दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 5 पैशांनी वधारले आहेत. तर डिझेल 12 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 76.01 रुपये आणि 69.17 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत गेल्या तीन दिवसांत पेट्रोल 27 पैशांनी तर डिझेल 38 पैशांनी महागले आहे. 

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जनरल कासीम सुलेमानी अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेल्यानंतर जागतिक शेअर बाजारात संमिश्र वातावरण आहे, तर दुसरीकडे कच्च्या तेलाचा भाव या घटनेनंतर वधारला आहे. इराणने अमेरिकेवर प्रतिहल्ला केल्यास चालू तिमाहीत कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरल 78 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पेट्रोलचा भाव पुन्हा एकदा प्रतिलिटर 90 रुपये होऊ शकतो.

(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)

महत्त्वाच्या बातम्या 

CAA : केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू

गाई-म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले, उद्यापासून अंमलबजावणी 

ट्रक-बसची भीषण टक्कर होऊन लागली आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू, 21 जण जखमी

कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...

 

Web Title: Today's Fuel Price petrol price today 11th january 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.