शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पंजाब: भाजपला मोठा धक्का! निवडणुकांमध्ये सनी देओल यांच्या मतदारसंघातील सर्व जागांवर पराभव

By देवेश फडके | Updated: February 17, 2021 13:39 IST

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भारतीय जनता पक्षाला (भाजप) पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसताना दिसत आहे. सुरुवातीचे कल हाती आले, तेव्हा काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप खासदार सनी देओल (sunny deol) यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. ( (punjab local bodies election 2021) 

ठळक मुद्देपंजाब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपची पीछेहाटखासदार सनी देओल यांच्या लोकसभा मतदारसंघात सर्व जागांवर पराभवअकाली दल, काँग्रेस यांची जोरदार मुसंडी

चंदीगड : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भारतीय जनता पक्षाला (भाजप) पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसताना दिसत आहे. सुरुवातीचे कल हाती आले, तेव्हा काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप खासदार सनी देओल (sunny deol) यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.  (punjab local bodies election 2021 bjp lost all seats in sunny deol constituency)

शेतकऱ्यांच्या रोषाचे केंद्र ठरलेल्या भाजपला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप खासदार सनी देओल यांच्या गुरदासपूर मतदारसंघातील सर्व २९ जागांवर भाजपचा पराभव झाला असून, या जागांवर काँग्रेसचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. 

पंजाबमधील पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बोलबाला, मतदारांनी भाजपाला असा कौल दिला

पंजाबमधील निवडणुकांत आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकावर असून, शिरोमणी अकाली दल दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपाची मोठी घसरण झाल्याचे असून, आम आदमी पक्षानेही काही ठिकाणी विजय मिळवण्यात यश मिळवले आहे, असे समजते. 

अकाली दलासोबतची युती तुटल्यानंतर प्रथमच एकट्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. मजिठामध्ये १३ पैकी १० जागांवर अकाली दलाने, तरणतारणमधील भिखिविंड नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने ११ तर अकाली दलाने २ जागांवर विजय मिळवला आहे. राजकोटमधील सर्व १५ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. जलालाबादमध्ये १७ पैकी ९ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. नंगल, लोहियाँ आणि नूरमहल येथेही काँग्रेसने विजय मिळवला आहे. राजपूरामध्ये २७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगामध्येही काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे.

टॅग्स :PunjabपंजाबSunny Deolसनी देओलElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा