कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना घेतलं निशाण्यावर, दिला मोलाचा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:37 IST2022-05-06T15:36:12+5:302022-05-06T15:37:31+5:30
कुमार विश्वास यांनी ट्विट करत तेजिंदर पाल बग्गा यांच्या अटकेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना घेतलं निशाण्यावर, दिला मोलाचा सल्ला!
भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांना पंजाबपोलिसांनी अटक केल्यानंतर, कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारवर निशाणा साधला आहे. कुमार विश्वास यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना, जनतेच्या करातून मिळालेल्या पैशांचा गैरवापर करू नये, असा सल्ला दिला आहे. याच बरोबर, भगवंत मान यांनी आपल्या पगडीचाही मान ठेवावा, असेही कुमार विश्वास यांचे म्हणणे आहे.
कुमार विश्वास यांनी ट्विट करत तेजिंदर पाल बग्गा यांच्या अटकेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''प्रिय धाकट्या भावा, पंजाबने गेल्या 300 वर्षांत, दिल्लीच्या कुण्याही असुरक्षित हुकूमशहाला आपल्या ताकदीशी खेळू कधीही खेळू दिले नाही. पंजाबने आपल्या पगडीला ताज सोपावला आहे, कुण्या दुर्योधनाला नाही. पंजाबच्या जनतेच्या टॅक्सचे पैसे आणि त्यांच्या पोलिसांचा अपमान करू नका, पगडी सांभाळा.''
प्रिय छोटे भाई @BhagwantMann
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) May 6, 2022
ख़ुद्दार पंजाब ने 300साल में, दिल्ली के किसी असुरक्षित तानाशाह को अपनी ताक़त से कभी नहीं खेलने दिया।पंजाब ने तुम्हारी पगड़ी को ताज सौंपा है किसी बौने दुर्योधन को नहीं।पंजाब के लोगों के टैक्स के पैसों व उनकी पुलिस का अपमान मत करो
पगड़ी सम्भाल जट्टा🇮🇳🙏
पंजाब पोलीस शुक्रवारी दिल्ली येथे भाजप प्रवक्ते तेजिंदर पाल बग्गा यांच्या घरी पोहोचले. यानंतर तेजिंदर पाल बग्गा याच्या अटकेचे वृत्त आले. तेजिंदर पाल बग्गा यांच्यावर गेल्या 40 दिवसांपूर्वी, अरविंद केजरीवाल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पंजाबमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
आम आदमी पार्टीचे माजी नेते कुमार विश्वासही पंजाब पोलिसांच्या निशाण्यावर आहे. कुमार विश्वास यांच्यावरही गेल्या महिन्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, कुमार विश्वास यांना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कुमार विश्वास यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.