हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? फोटो शेअर करत नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 05:37 PM2021-12-15T17:37:59+5:302021-12-15T17:38:05+5:30

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योजतसिंग सिद्धू यांनी ट्विटरवर त्यांचा आणि हरभजन सिंगचा एक फोटो शेअर केला आहे.

Punjab Election News: Will Harbhajan Singh join Congress? Navjyot Singh Sidhu shares photo with him | हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? फोटो शेअर करत नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले...

हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? फोटो शेअर करत नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले...

Next

चंदीगड: पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी तयारी वाढवली आहे. यातच अनेक मोठ्या नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू असतानाच आता एक दिग्गज क्रिकेटर काँग्रेसमध्ये प्रवेस करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंगकाँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शक्यतांनी भरलेले चित्र

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी त्यांच्या ट्विटरवर हरभवन सिंगसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सिद्धू आणि हरभजन दोघेही हसत-हसत एकत्र उभे आहेत. सिद्धूंनी हा फोटो पोस्ट करत ट्विटमध्ये लिहिले, 'शायनिंग स्टार भज्जीसोबत. हे चित्र अनेक शक्यतांनी भरलेले आहे.'

सिद्धूच्या ट्विटवर हरभजनचे मौन

यापूर्वी हरभजन सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशाप्रकारची एक बातमीही समोर आली होती. मात्र, हरभजनने या वृत्तांचे खंडन करत, ती 'फेक न्यूज' असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता नवज्योतसिंग सिद्धूंच्या या ट्विटने राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत हरभजन याबाबत स्पष्टीकरण देऊ शकतो. मात्र, तूर्तास त्यांने सिद्धूंच्या ट्विटवर मौन पाळले आहे.

पंजाबमध्ये पुढील वर्षी निवडणुका

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, भाजप आणि आम आदमी पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चरणजीत सिंग चन्नी सध्या पंजाबमधील काँग्रेस सरकारचे नेतृत्व करत आहेत. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या एसएडीने बसपाशी हातमिळवणी केली आहे. तर, भाजप आणि कॅप्टन अमरिंदर यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष युतीच्या शक्यता तपासत आहे. आम आदमी पक्ष सध्या निवडणुकीच्या रिंगणात एकटा पडला आहे.
 

Web Title: Punjab Election News: Will Harbhajan Singh join Congress? Navjyot Singh Sidhu shares photo with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.