शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Punjab Election 2022: अमृतसरच्या अजब सोहना-मोहनाची गजब स्टोरी; पहिल्यांदाच मतदान कसं करणार? 

By यदू जोशी | Updated: February 12, 2022 06:54 IST

एकमेकांना माहितीच पडणार नाही की कोणाला दिले मत, या दोघांचे मतदान एकमेकांना दिसू नये यासाठीची खबरदारी निवडणूक आयोग घेणार आहे.

यदु जोशीअमृतसर : सोहना सिंग अन् मोहना सिंग ही अजब भावांची गजब जोडी राहते अमृतसरच्या पिंगलवाडा सोसायटीत. हे दोघे भाऊ एकमेकांना जोडूनच जन्माला आले आणि आजवर त्यांचा सोबतच जीवनप्रवास सुरू आहे. ते उत्तम गायकदेखील आहेत. पंजाबची निवडणूक २० फेब्रुवारीला होतेय; पण हे दोघे मतदान केंद्राधिकारी  असल्याने १९ तारखेलाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.कारण मतदानाचा हक्क बजावत असलेले हे दोघे बंधूदेखील आहेत. सोहना-मोहना सिंग या जगावेगळ्या बंधूंची शुक्रवारी अमृतसरमध्ये भेट झाली.

दिलखुलास गप्पा मारताना त्यांनी राजकारणावरील चर्चेला मात्र बरोबर फाटा दिला. आम्ही राजकारणावर बोलू नाही शकत, मतदान केंद्राधिकारी आहोत ना! असे सोहनाने किंचित हसत सांगितले. लोक समजूतदार असतात, बरोबर मतदान करतात अशी पुस्तीही त्यांनी जोडली.  दोघेही पंजाबच्या विद्यमान सरकारबद्दल कृतज्ञ आहेत. कारण, या सरकारने त्यांना पंजाब राज्य वीज महामंडळात नोकरी दिली आहे. एकमेकांना जुळलेले हे १९ वर्षीय जुळे भाऊ यावेळी केवळ पहिल्यांदा मतदानच करताहेत असे नाही तर ते मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. या दोघांचे मतदान एकमेकांना दिसू नये यासाठीची खबरदारी निवडणूक आयोग घेणार आहे.

तुमचे स्वप्न काय, या प्रश्नात सोहना सिंग म्हणाला, आम्हाला दोघांनाही नामवंत गायक व्हायचे आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या मुंबईतील अकादमीत ते शिकतात; पण सध्या ऑनलाइन क्लास सुरू आहे. गेल्या महिन्यात हे  शंकर महादेवन यांना भेटले होते. 

साधी राहणी... सोहनाच्या शरीराच्या भागात जखम झाली, काही लागलं तर त्याला वेदना होतात. तसेच मोहनाबाबतही घडते.  मोहना म्हणाला बरेचदा याला झोप लागते, मी जागा असतो; पण मी त्याला त्रास देत नाही. मोबाइल बघत असतो. दोघांचे पोट एकच आहे; पण एकाने जेवण करून दोघांचे पोट भरत नाही. दोघांनाही एनर्जी हवी असते त्यामुळे दोघांनाही जेवावे लागते. दोघे जुळलेले जुळे असलो तरी आमचे भावविश्व अगदीच वेगळे आहे, आमच्या आवडीनिवडीदेखील बऱ्याच बाबतीत वेगळ्या आहेत, असे सोहनाने सांगितले.

सोहना-मोहना यांना जन्म दिल्लीच्या कृपलानी इस्पितळात १४ जून २००३ रोजी झाला; पण जन्मताच त्यांना  मातापित्यांनी सोडून दिले होते. पिंगलवाडा अनाथाश्रमात त्यांचा सांभाळ झाला. दोघांनी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. दोघांची राहणी अगदी साधी आहे. विचार मोठा हवा, राहणीचे काय एवढे, अशी भावना दोघांनीही बोलून दाखविली.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ElectionनिवडणूकVotingमतदान