शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

केंद्रानं पाकिस्तानकडून ऑक्सिजच्या आयातीची मंजुरी दिली नाही: अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 11:58 AM

Coronavirus Oxygen crisis : ऑक्सिजनची उपलब्धता नसल्यामुळे पंजाबमधील रुग्णालये बेड्सची संख्या वाढविण्यास असमर्थ असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं.

ठळक मुद्देऑक्सिजनची उपलब्धता नसल्यामुळे पंजाबमधील रुग्णालये बेड्सची संख्या वाढविण्यास असमर्थ असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं. पंतप्रधानांकडे केली अतिरिक्त ऑस्किजन पुरवण्याची मागणी

पानीपत आणि बरोटीवाला येथून ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचं मत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी व्यक्त केलं. "वाघा-अटारी सीमेवरुन पंजाबच्या स्थानिक उद्योगांना पाकिस्तानकडून ऑक्सिजनची व्यावसायिक आयात करण्यास परवानगी देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शविली आहे. पंजाबच्या आरोग्य सेवा प्रणालीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल," असे ते म्हणाले. राज्यात सुमारे १० हजार रूग्ण ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली असल्याचं मत अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केलं. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी तातडीने ५० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे २० टँकरची मागणी केली आहे.पर्यायी स्रोतांकडून पुरेसा पुरवठा होईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु असं झाले नाही याबद्दल आपल्याला खेद आहे, असं ते म्हणाले. ऑक्सिजनची उपलब्धता नसल्यामुळे पंजाबमधील रुग्णालये बेड्सची संख्या वाढविण्यास असमर्थ असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं. सध्या पंजाब सरकार दररोज दोन रिकामे टॅकर एअरलिफ्ट करून रांची येथे नेत आहे. तसंच भरलेले टँकर रस्ते मार्गानं राज्यात आणले जात आहे. रांचीहून टँकर रस्ते मार्गानं पंजाबमध्ये पोहोचण्यास २ दिवसांचा कालावधी लागतो. पंजाबचा ऑक्सिजन कोटो १९५ मेट्रिक टनचा आहे. त्यापैकी ९० मेट्रिक टन बोकारो आणि १०५ मेट्रिक टन ऑक्सिजन हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांखंडमधून येत आहे. आपल्याला हिस्स्याच्या ऑक्सिजन आपल्याला मिळत नसल्याचंही अमरिंदर सिंग यांनी यावेळी नमूद केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबHaryanaहरयाणाOxygen Cylinderऑक्सिजनIndiaभारतPakistanपाकिस्तान