Punjab Boy Who Spent Rs 16 Lakh of Father's Money on PUBG Made to Work at Scooter Repair Shop | मुलानं पब्जीच्या नादात उडवले 16 लाख; वडिलांनी धडा शिवण्यासाठी त्याला लावलं 'या' कामाला...

मुलानं पब्जीच्या नादात उडवले 16 लाख; वडिलांनी धडा शिवण्यासाठी त्याला लावलं 'या' कामाला...

ठळक मुद्देमुलाने सर्व ट्रांजेक्शन आपल्या आईच्या फोनवरून केले होते.बँक ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर आईच्या फोनवरून सर्व ट्रांजेक्शन मेसेज डिलीट करत होता.

नवी दिल्ली / चंदीगड : पंजाबमध्ये ऑनलाईन गेमच्या नादात एका मुलाने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून जवळपास 16 लाख रुपये उधळल्याचे समोर आले आहे. यानंतर वडिलांनी मुलाला धडा शिवकण्यासाठी आणि पैशाचे महत्त्व समजण्यासाठी एका स्कूटर दुरुस्ती दुकानात काम लावण्याचा निर्णय घेतला आहे.

‘द ट्रिब्यून’ शी बोलताना मुलाचे वडील म्हणाले की, "आम्ही त्याला आता घरी बसून राहू देणार नाही किंवा त्याला शिक्षण घेण्यासाठी मोबाईल देणार नाही. आता तो स्कूटर दुरूस्तीच्या दुकानात काम करत आहे, जेणेकरुन पैसे कमविणे किती अवघड आहे, हे त्याला समजेल."  याचबरोबर, पब्जी गेमच्या नादात मुलाने सहज पैसे उधळले. ते पैसे मुलाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी ठेवले होते, असे त्यांनी सांगितले.

या मुलाने आपल्या मित्रांचे पब्जी अकाऊंट अपग्रेड करण्यासाठी देखील पैसे खर्च केले आहेत. बँक स्टेटमेंटमधून या पैशांच्या खर्चाचा तपशील मिळाला आहे. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, ज्यावेळी याबाबत मला माहिती मिळाली. तोपर्यंत 16 लाख रुपये खर्च केले होते. मुलाने त्यांना सांगितले होते की, अभ्यासासाठी मोबाईलचा वापर बराच काळ सुरु असतो. मात्र, अभ्यासाऐवजी तो बर्‍याच वेळ पब्जी खेळण्यात मग्न होता.

याचबरोबर, मुलाचे वडील घरापासून दूर नोकरी करतात, तर मुलगा आणि त्याची आई गावात राहतात. मुलाने सर्व ट्रांजेक्शन आपल्या आईच्या फोनवरून केले होते. तसेच, मुलगा आपल्या आईचा फोन पब्जी खेळण्यासाठी करत होता. बँक ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर आईच्या फोनवरून सर्व ट्रांजेक्शन मेसेज डिलीट करत होता, असेही या मुलाच्या वडिलांनी सांगितले.

आणखी बातम्या...

BSNLचा भन्नाट प्लॅन! 90 दिवसांपर्यंत दररोज मिळणार 5GB डेटा

मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच, सतर्कतेचा इशारा    

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Punjab Boy Who Spent Rs 16 Lakh of Father's Money on PUBG Made to Work at Scooter Repair Shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.