Heavy rains continue in Mumbai, Thane and many other parts of the state | मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच, सतर्कतेचा इशारा

मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच, सतर्कतेचा इशारा

ठळक मुद्देठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातही सकाळपासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.आज पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

मुंबई : मुंबई शहर, उपनगरासह ठाणे परिसरात रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मुंबई शहरासह उपनगरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आजही मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. 

मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरातील विविध भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. उपनगरातील कांदिवली, मलाड, बोरीवली भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच, चेंबूरच्या पोस्टल कॉलनी विभागात रात्रभर झालेल्या पावसाने गुडघाभर पाणी साचले आहे. या कॉलनीमधील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या कॉलनीमधील काही घरात देखील पाणी भरले आहे. तर मुंबईतील हिंद माता, दादर, सायन आणि किंग्ज सर्कल या भागातही पाणी साचले आहे.


ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातही सकाळपासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या भागातही ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला.


दरम्यान, आज पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आणखी बातम्या....

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Heavy rains continue in Mumbai, Thane and many other parts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.