BREAKING: अमृतसरमध्ये दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र! उच्चभ्रू वस्तीत सापडला हँड ग्रेनेड, बॉम्ब स्कॉड दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:45 IST2021-08-13T13:45:20+5:302021-08-13T13:45:53+5:30
पंजाबच्या अमृतसरमध्ये शुक्रवारी एका उच्चभ्रू नागरी वस्तीत हँड ग्रेनेड आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

BREAKING: अमृतसरमध्ये दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र! उच्चभ्रू वस्तीत सापडला हँड ग्रेनेड, बॉम्ब स्कॉड दाखल
पंजाबच्या अमृतसरमध्ये शुक्रवारी एका उच्चभ्रू नागरी वस्तीत हँड ग्रेनेड आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. ग्रेनेडला निष्क्रीय करण्याचं काम सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वस्तीत सफाई कर्मचारी साफसफाईचं काम करत असताना त्याला ग्रेनेड आढळला. त्यानंतर तातडीनं याची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आलं.
अमृतसरच्या रंजीत एव्हेन्यू या उच्चभ्रू नागरी वस्तीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. डीसीपी मुखविंदर सिंग भुल्लर देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हँड ग्रेनेडसारखी एक वस्तू आढळली असून तपास सुरू आहे. बॉम्ब शोधक नाशक पथक देखील बोलविण्यात आलं आहे.
रविवारी १५ ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार असून संवेदनशील ठिकाणी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईनं लक्ष दिलं जात आहे. सुरक्षा यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा अंदाज गुप्तचर विभागानं वर्तवला आहे.