Punawala welcomes Modi's role in providing vaccines | लस पुरवण्याच्या मोदींच्या भूमिकेचे पुनावालांकडून स्वागत

लस पुरवण्याच्या मोदींच्या भूमिकेचे पुनावालांकडून स्वागत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्यासंदर्भात जी तयारी चालविली आहे त्या भूमिकेचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्वागत केले आहे. लस विकत घेण्यासाठी तसेच वितरणासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केली आहे का असा सवाल विचारणाºया पुनावाला यांनी त्याच्या दुसºया दिवशीच आपली भूमिका बदलली आहे.

लसीच्या जगभर वितरणाबाबत पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत वक्तव्य केले होते. या उद्गारांबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अदर पुनावाला यांनी कौतुक केले आहे. भारतातील प्रत्येकाला लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे पुढील वर्षभरात ८० हजार कोटी उपलब्ध होऊ शकतील, का असा परखड सवाल पुनावाला यांनी शनिवारी विचारला होता. मात्र मोदींचे भाषण ऐकून पुनावाला यांचे मत बदलले आहे.

प्रयोगावस्थेतील लसीमुळेचिनी नागरिक चिंतेत
अजून प्रयोगावस्थेत असलेली कोरोना प्रतिबंधक लस चीनमध्ये हजारो नागरिकांना दिली जात असून, त्यामुळे या नागरिकांच्या प्रकृतीला अपाय होण्याची भीती आहे. ही लस टोचल्याची कुठेही वाच्यता करू नये असे बंधन संबंधित व्यक्तींवर सरकारने घातल्याने लस टोचलेल्या व्यक्ती प्रसारमाध्यमांशी बोलायला कचरत आहेत. सरकारी कंपन्या, लसनिर्मिती कंपन्यांतील कर्मचारी, शिक्षक अशा हजारो लोकांना ही लस टोचण्यात असून ते चिंतेत आहेत.

पंतप्रधानांची जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रशंसा
साºया जगासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन व वितरण करण्याची भारताची तयारी आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांत केलेल्या भाषणातील उद्गारांचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस अधनोम यांनी स्वागत केले आहे. सर्व साधने एकत्रित करून कोरोनाशी लढा देण्याची गरज आहे असे अधनोम यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Punawala welcomes Modi's role in providing vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.