pulwama attack nia arrests person who sheltered suicide bomber vrd | पुलवामा हल्ल्याच्या कटातील दहशतवाद्याला अटक, NIAला मोठं यश

पुलवामा हल्ल्याच्या कटातील दहशतवाद्याला अटक, NIAला मोठं यश

ठळक मुद्देराष्ट्रीय तपास यंत्रणे(National Investigation Agency)ला पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोठं यश मिळालं आहे. पुलवामा हल्ल्याशी संबंधित एक आरोपी आणि जैश-ए-मोहम्मदचा अंडर ग्राऊंड वर्कर शाकीर बगीर मगरेला अटक केली आहे. शाकीरनं आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डार याला आश्रय दिला होता, तसेच त्याला इतर रसद पुरवली होती.

नवी दिल्ली- राष्ट्रीय तपास यंत्रणे(National Investigation Agency)ला पुलवामा हल्ल्याच्या तपासात मोठं यश मिळालं आहे. पुलवामा हल्ल्याशी संबंधित आरोपी आणि जैश-ए-मोहम्मदचा अंडर ग्राऊंड वर्कर शाकीर बगीर मगरेला NIAने अटक केली आहे. शाकीरनं आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद डार याला आश्रय दिला होता, तसेच त्याला इतर रसद पुरवली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणे(National Investigation Agency)च्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या आत्मघातकी हल्ल्यात बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं अमोनियम नायट्रेट, नायट्रो ग्लिसरीन आणि आरडीएक्ससारख्या स्फोटकांची सामग्री ऑनलाइन ऑर्डर केली होती, असा खुलासा मगरेने केला आहे.  बॅटरी आणि अमोनियम नायट्रेट ज्याचा बॉम्ब बनवण्यात वापर होतो, ते ऑनलाइन मागवण्यात आलं होतं.   

डारच्या पूर्वी हल्लेखोर चालवत होता गाडी
मगरेनं सांगितलं की, सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेली स्फोटकांनी भरलेली कार घटनास्थळाच्या सुमारे 500 मीटर अंतराच्या आधी तो चालवत होता. तो हल्ल्याच्या ठिकाणाहून 500 मीटर अंतराच्या आधीच कारमधून खाली उतरला आणि त्यानंतर आदिल अहमद डारने कार चालवून हल्ला केला. एनआयएने अशी माहिती दिली की त्याने आदिल अहमद डार आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूक याला घरी 2018च्या उत्तरार्धात म्हणजेच पुलवामा हल्ला घडेपर्यंत आश्रय दिला होता.

इतकेच नव्हे, तर मगरेने या दोघांना आयईडी बॉम्ब तयार करण्यात मदत केली होती. मगरेला सखोल चौकशीसाठी 15 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठविण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर मागील वर्षी 14 फेब्रुवारी रोजी हल्ला केला होता. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. जैशच्या दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यामध्ये स्फोटकांनी भरलेली कार घुसवली होती आणि भीषण आत्मघातकी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.

English summary :
Today, in a major breakthrough in Pulwama case, NIA arrested one accused Shakir Bashir Magrey, an Over-Ground Worker of JeM. He had provided shelter and other logistical assistance to the suicide-bomber Adil Ahmad Dar.

Web Title: pulwama attack nia arrests person who sheltered suicide bomber vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.