शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीच्या जाणिवेतूनच होते लोकोपयोगी कार्य

By admin | Updated: September 22, 2014 04:40 IST

आमदार मंगेश सांगळे गरिबीतून वर आल्याने त्यांना गरिबांच्या, हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या सुख-दु:खाची जाणीव आहे

मुुंबई : आमदार मंगेश सांगळे गरिबीतून वर आल्याने त्यांना गरिबांच्या, हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांच्या सुख-दु:खाची जाणीव आहे. याच जाणिवेतून त्यांनी लोकोपयोगी कार्य केलेले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार सांगळे यांच्या ‘लढा नवनिर्माणाचा’ या पुस्तकाचू प्रकाशन काल सिंधूताई यांच्या हस्ते विक्रोळीतील कन्नमवार नगरातील कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात पार पडले. विक्रोळी मतदारसंघात अतिशय चांगले काम करणाऱ्या सांगळे यांच्यासारख्या गुणी लोकप्रतिनिधींच्या मागे जनतेने उभे राहिले पाहिजे, असे सिंधूताई सिंधूताई सपकाळ यांनी या वेळी सांगितले. समर्थ चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या या सोहळ्यात मनसेचे सरचिटणीस आमदार बाळा नांदगावकर, ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ, वागीश सारस्वत आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभेत मांडलेले मुद्दे आणि भाषणांचा या पुस्तकात समावेश आहे.राजकारणी म्हणजे दुसऱ्याच्या शिखातून पैसा काढणारा अशी ओळख असते. मात्र सांगळे यांनी स्वत:च्या खिशात हात घालून लोकांची कामे केली आहेत, असे नांदगावकर म्हणाले. मुजफ्फर हुसेन आणि वामन होवाळ यांनी या पुस्तकाची स्तुती केली. सांगळे हे समाजातील सर्व लोकांना आपलेसे वाटतात. म्हणूनच सर्व समाजघटकांचा त्यांना पाठिंबा मिळतो, असे प्रतिपादन होवाळ यांनी केले.प्रत्येक निवडणुकीत माझी शैक्षणिक गुणवत्ता वाढत गेली. नगरसेवक झाल्यावर कला शाखेची पदवी संपादन केली. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर कायद्याची पदवी संपादन केली. आता कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे, असे सांगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)