शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
5
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
6
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
7
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
8
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
9
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
10
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
11
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
12
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
13
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
15
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
16
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
17
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
18
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
19
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
20
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

‘ स्मार्ट सिटी’ साठी लोकसहभाग हवा - प्रा़ नरेंद्र काटीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 02:01 IST

‘ स्मार्ट सिटी’ साठी लोकसहभाग हवा

‘ स्मार्ट सिटी’ साठी लोकसहभाग हवा
- प्रा़ नरेंद्र काटीकर
प्रा़ नरेंद्र काटीकर, समन्वयक जनसहभाग, मिशन, स्मार्ट सिटी, सोलापूर
एका अविस्मरणीय अशा विकासाच्या स्पर्धेत आपल्या सोलापूर शहराने देशात ‘‘मोठय़ा दिग्गज’’ शहरांना मागे टाकून नववा क्रमांक घेतला़ ती स्पर्धा म्हणजे स्मार्ट सिटी़ स्मार्ट सिटी मिशनचा मी एक भाग असल्यामुळे प्रचंड असा आनंद तर झालाच आणि त्याचाच एक घटक असल्याच्या अभिमानामुळे ऊर भरून आला़ दुर्दम्य आशावाद, प्रचंड इच्छाशक्ती व प्रामाणिक आणि अविर्शांत गुणवत्तापूर्ण अहवाल याद्वारे सोलापूर शासन, प्रशासन यांनी या विजयावर शिक्कामोर्तब केले तर या संपूर्ण प्रक्रि यामध्ये अभ्यासपूर्ण अशा टप्प्यामध्ये सादर केलेली माहिती ही अत्यंत सुयोग्य प्रकारे, स्पष्टपणे मूल्यांकन के ल्याचं र्शेय हे नक्कीच केंद्र सरकारला व त्यांच्या व्यवस्थेला दिलेच पाहिज़े
साधारणत: नवे सरकार आल्यानंतर नवनवीन घोषणा होतातच तथापि अनेक लोकाभिमुख व केवळ प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून देशाचा सर्वस्वी विकास या भूमिकेतून अनेक योजना आल्या जसे डी़आय़ , स्वच्छ भारत यातील एक अशी संकल्पना म्हणजे ‘स्मार्ट सिटी’ या पूर्ण योजनेप्रमाणे ‘स्मार्ट सिटीचा प्रमुख 1्रि5्रल्लॅ ा1ूी हा होता. जनसहभाग व जनसहभागातूनच विकास ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आली व त्याचे प्रकटीकरणही लोकांना त्यात ‘आपला ’ सहभाग किती आवश्यक व महत्त्वपूर्ण आहे हे कळले त्याच अनुषंगाने सर्वात पुढे महत्त्वाची भूमिका ही जनसहभागाची लोकांच्या सहकार्याची राहणार आह़े खर्‍या अर्थाने एक नवीन जोशाने, उत्साहाने एका नवीन सुवर्ण मार्गावर चालण्यासाठी सारे सोलापूरकर आतुर झाले आहेत़
स्वातंत्र्योत्तर काळात अनेक योजनांद्वारे ‘‘जीवन’’ हे आदर्श करण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु काही पाऊलांमुळे हे मोठय़ा शहराचे मोठे प्रश्न निर्माण झाल़े जसे की बकालपणा, अस्वच्छता, सोयीसुविधांचा तोकडा वापर इ़ चे परिणाम हे दूरगामी दिसू लागल़े जसे प्रत्येक मानवाचे स्वप्न हे आदर्श जीवन तेही आदर्श समाजरचनेमध्ये जगावे हे असते त्यामुळेच काही वर्षात आपण स्मार्ट पद्धतीने जीवन कसे जगू शकतो यावर विचार कार्य सुरू केल़े प्रामुख्याने शहरी भागाक डे रोजगार व इतर कारणाने वाढणारा लोंढा हा अनेक शहरांवर सर्वच व्यवस्थात्मक बाबींचा ताण वाढविणारा ठरला आह़े तथापि मानवी किंबहुना भारतीय संस्कृतीला, लोकशक्ती, संस्कृती, व्यवसाय, उत्पादन केंद्र अशा अनेक घटकांनी गती देऊन अविरत प्रगतीपथावर मार्गस्थ केले आह़े तथापि हे सर्व प्रामुख्याने शहर या सं™ोवर केंद्रीत होत असताना जास्त घनतेची लोकसंख्या व्यावसायिक कौशल्य सामाजिक व वंशीय एकजिनसीपणाचा अभाव, याचा देखील प्रभाव ध्यानात घेणे आवश्यक ठरत़े
त्यातूनच ही काय केंद्र शासनाच्या कल्पनेतून या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी व त्यासाठी लागणार्‍या साधनांची जुळवाजुळव करण्यासाठी कठोर पर्शिम घेऊन कार्यक्र म शाश्वत, आर्थिक भरभराट, सामाजिक कल्याण करू शकणारे शहर म्हणजेच स्मार्ट सिटी अशी मांडणी केली़ त्यातच उदारीकरण, नवीन पिढीच्या आर्थिक सुधारणांबरोबर सुव्यवस्थित नियोजन, भारतीय अर्थव्यवस्थेवर योग्य ती पकड व वेग यामुळे अनेक प्रकारच्या विकासाचा मार्ग हा व्यापक झाला आहे. या आर्थिक बाबींना धरुन एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घ्यावा तो असा की, 2/3 जीडीपी हा शहरी भागातून निर्माण होत असताना त्यासाठी सर्वंकष अत्युत्तम अशा प्रकारच्या सुविधा देणे क्रमप्राप्त ठरत़े
यामधूनच सुविधा सर्वसमावेशकता, प्रामाणिकपणा आणि न्याय याचा विचार घेऊन नवसंशोधनातून एक ‘‘स्टेट ऑफ दि आर्ट’’ अशी अनेक सुविधा देण्याचे उद्दिष्ट ठरविणारी एक संकल्पना आली. साधारणपणे 1980 च्या दशकात सर्वप्रथम स्मार्ट सिटीची संकल्पना समोर आली़ ‘शहरांची नवी ओळख’ म्हणून या संकल्पनेचा पुढे वेगाने विकास झाला़ स्मार्ट सिटी मिशनमध्ये 2015-16 ते 2016 - 20 या 5 वर्षांच्या काळात सुमारे 98 शहरांची निवड झाली जो नागरी विकास विभागांच्या मूल्यांकनावर अवलंबून आह़े स्वाभाविकच कोणतीही नवी योजना आली की त्याचे स्वरूप अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा होताना दिसत़े त्यामध्ये सर्वंकष चर्चा होऊन त्यातील आपापल्या परीने अपेक्षित साध्य होणारी उद्दिष्टे असणार्‍या र्मयादा, अडीअडचणी या दृष्टीस पडतात़ तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अद्वितीय अशा योजनामुळे एक प्रकारची निकोप अशी स्पर्धा विविध शहरांमध्ये विकास या मुद्यांवर सुरु झाली ही एक मोठी उपलब्धी आह़े
प्रत्यक्षात ज्या ज्या शहरांना प्रगल्भ उपायांनी स्मार्ट व्हायचे आहे अशा शहरांच्या क्षमतांना विकसित करावयाचे ध्येय ठेवले आहे. प्रामुख्याने पायाभूत सुविधा व स्मार्ट उपाययोजना याद्वारे वस्तुत: सिटीची संरचना पुरेसा पाणीपुरवठा, सुनिश्चित वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सक्षम गतिशील सार्वजनिक परिवहन, किफायतशीर घरे, सक्षम आय.टी. कनेक्टीव्हीटी व डिजिटललायझेशन, सुस्थिर पर्यावरण, आरोग्य, सुरक्षा, शिक्षण व्यवस्था, व्यापार, सेवा केंद्र, कौशल्यविकास केंद्र इत्यादीचा अंतर्भाव आहे. या विविध मॉडेलमध्ये ‘शहरे’ हे नागरिक व उद्योगपती यांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा करतील. हे सर्व प्रत्यक्षात उतरविण्यासाठी विशेष उद्देश माध्यमांद्वारे बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या संरचनेमध्ये कार्यरत असेल. ज्यामध्ये लोकप्रतिनिधी, आयुक्त, महापौर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा समावेश असेल. जरी त्याची नियमावली याला अजून स्पष्टता आली नसली, तत्पूर्वी एसपीव्ही बाबत वादविवाद हा छेडलेला दृष्टीत पडतो. प्रत्यक्षात ‘स्पेशालिटी प्रोजेक्ट इंम्पिलीमेंटेंशन’ साठी एक स्वतंत्र स्पेशीपिक फोकस्ड डेडीकेटेड सक्षम टीमची उभारणीच याद्वारे होत आहे असे दिसते.
या सर्वांसाठी आर्थिक नियोजन तरतूद ही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य, केंद्र यांचे योगदान, पब्लिक - प्रायव्हेट, पब्लिक-पब्लिक अशा पार्टनरशीपचे प्रकार, योग्य सुधारित करप्रणाली यामुळे आर्थिक तोडगा काढता येऊ शकेल.
ज्या शहराच्या विकासाचे मॉडेल हे तयार करताना त्या शहराची संबंधित कार्यप्रणाली, संस्कृती, व्यवस्था, इतिहास, मानसिकता, आवश्यक त्या अपेक्षा इ. चा निकडीने अभ्यास होणे आवश्यक असते. यामध्ये हिरिरीने शासन, प्रशासन, शिक्षणतज्ज्ञ विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सर्वात महत्त्वाचे ‘नागरिक’ हे आपले दायित्व फार तन्मयतेने निभावणे आवश्यक असते. त्यामुळे मुळातच अशासाठी जनसंवादाने किंबहुना नागरिकांच्या सहकार्याने नव्हे तर सहभागामुळे हे मॉडेल सर्वस्वी तयार करावे असा आग्रह आहे. यासाठी आपल्या सो.म.पा. मध्ये यांनी विविध संस्था, संघटना, घटक, व्यावसायिक विद्यार्थी, तंत्रज्ञ, प्राध्यापक, नोकरदार इ. जनसामान्यांचा विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला. जसे की ‘व्हिजन स्टेटमेंट’ तयार करण्याचा असतो. क्षेत्र विकासासाठी क्षेत्र निवडीचे असो त्यामध्ये लोक सहभाग हा अतुलनीय असा होता. तसेच स्मार्ट सोल्युशनसाठी टेक्नोक्रॅट सेल हा टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून कार्यरत असताना सहयोगाने टेक्नोफेअरचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये अनेक विविध तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, व्यावसायिक सहभागी झाले होते. निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, डिजिटल इंडिया, माय गव्ह. इन ट्रेनिंग प्रोग्राम अशा अनेक उपक्रमांमध्ये टेक्नोक्रॅट सेलचा सहभाग हा महत्त्वपूर्ण राहिला. या अशा महत्त्वपूर्ण ्रू3्र9ील्ल2 ील्लॅंॅीेील्ल3 च्या मुद्यांवर सोलापूरचे नाव हे प्रदेशात नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर वाखाणले गेले.
‘अमृत’, ‘हृदय’ प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या अनेक योजना या स्मार्ट सिटीला पूरक ठरणार आहेत. त्यामुळे या योजनाकडे देखील सर्वजण नेण्याचा प्रयत्न करतात. सर्वात महत्त्वाची योजना स्वच्छ भारत याचे फार मोठे महत्त्व या मिशनमध्ये अंतभरूत आहे.
अशा या आदर्शवत संकल्पनेचा स्मार्ट सिटीमुळे अनेक फायदे हे अनुभवास येणार आहेत. जीवनदर्जा, राहणीमान उंचावणे असो गुंतवणुकीत वाढ, रोजगार निर्मिती स्वीकारार्ह वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था बांधणी, वीज, पाणी, वायफाय, आरोग्य सुविधा, शिक्षण, सुरक्षा इ. अनेक आदर्शवत सोयींमुळे स्मार्ट सिटीचे फायदे हे यशस्वीपणे लोकांना निश्चितपणे ‘स्मार्ट’ घडवतील असे वाटते.
खरे तर अनेक प्रकारची मतं या स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने आली असता अनेकवेळा जरी हा स्मार्ट सिटीचा टप्पा राबवायला काही कालावधी लागला तरी त्यामध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे एक फार मोठी उपलब्धी ठरणार आहे. ती म्हणजे ्रू3्र9ील्ल2 ील्लॅंॅीेील्ल3 लोकजन-सहभाग हा सर्वस्तरातून शासन-प्रशासन यांचे ध्येयधोरण व अंमलबजावणीमध्ये सहभाग देतील.
सर्वार्थाने अखेर भारतीय नागरिकांचा या स्मार्ट सिटीमधील विविध गोष्टींबद्दल असलेला दृढविश्वास, अचूक पवित्रा, सकारात्मक मानसिकता, परिणामकारक सक्रिय गतिशील प्रशासन, सर्वात महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचाराला नष्ट करून विशिष्ट कालर्मयादित परिणामकारक कार्यपूर्ती करूनच या स्मार्ट जनतेमध्ये प्रवेश होऊ शकतो हे खरे होय !