'PUBG' च्या वेडापायी मुलाने वडिलांच्या अकाऊंटमधून 50,000 चोरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:23 AM2019-03-12T10:23:59+5:302019-03-12T10:54:06+5:30

पंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे.

PUBG Mobile addiction: Teenager steals Rs 50,000 from his father's bank account | 'PUBG' च्या वेडापायी मुलाने वडिलांच्या अकाऊंटमधून 50,000 चोरले

'PUBG' च्या वेडापायी मुलाने वडिलांच्या अकाऊंटमधून 50,000 चोरले

googlenewsNext
ठळक मुद्देपंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली.मुलाच्या वडिलांनी  बँक अकाउंटमधून 50,000रुपये वजा झाल्यामुळे यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.पैशातून पबजीसाठी गेमिंग पॅडसह पबजी मोबाइल स्क्रीन आणि गेमिंग अ‍ॅक्सिसरिज खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली.

जालंधर - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. जालंधरमध्ये ही घटना घडली आहे. पबजी खेळण्यासाठी त्यासंबंधीत काही सामान आणण्यासाठी पैसे चोरल्याची माहिती मिळत आहे. 

मुलाच्या वडिलांनी  बँक अकाउंटमधून 50,000 रुपये वजा झाल्यामुळे यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे चोरीला गेले. मात्र त्यांना त्याबाबत मोबाइलवर कोणताही ओटीपी आणि ट्रान्झॅक्शनचा मेसेज आला नाही. मग पैसे खात्यातून गेले कसे?, असा प्रश्न त्यांना पडला त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी सायबर सेलकडे हे प्रकरण सोपवल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा  झाला. मुलाने त्याच्या मित्राच्या पेटीएम खात्यावरून पबजीसाठीच्या साहित्याची खरेदी केली. नंतर वडिलाच्या मोबाइलवर आलेला ओटीपी मेसेज डिलीट केला. पेटीएममधून पैसे गेले असून या पैशातून पबजीसाठी गेमिंग पॅडसह पबजी मोबाइल स्क्रीन आणि गेमिंग अ‍ॅक्सिसरिज खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.  आपल्याच मुलाने पैसे चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलांनी पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली आहे. 

PUBG वर बंदी आणा, 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'PUBG' या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी एका चिमुकल्याने काही दिवसांपूर्वी केली होती.  मुंबईतील 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने PUBG वर बंदी आणा असं सांगणार एक पत्र केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिलं होतं. अहद असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं. PUBG मुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहेत. तसेच मुलं हिंसक होत असल्याचं सांगत अहदने या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. अहदची आई मरियम नियाझ या वकील आहेत. 'सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,' असे त्यांनी म्हटले होते. 

'तो' सलग 10 दिवस PUBG खेळला, अन्...

सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. काही दिवसांपूर्वी पबजी खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील अशाच एका तरुणाला महागात पडली होती. सलग 10 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती समोर आली होती.  

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

Web Title: PUBG Mobile addiction: Teenager steals Rs 50,000 from his father's bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.