शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

देशाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करुन देणार

By admin | Updated: June 8, 2015 02:44 IST

२०१९ पर्यंत देशातील घराघरात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.

मुंबई : ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा बचतीच्या दृष्टीने यंदाचे वर्ष कमालीचे यशस्वी ठरले असून २०१९ पर्यंत देशातील घराघरात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखती दरम्यान गोयल बोलत होते. २०२० सालापर्यंत देशातील वीज उत्पादनात ५० टक्के वाढ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीन विविध आघाड्यांवर काम सुरु आहे. यंदा कोळसा उत्पादनात ८.३ टक्के तर वीज उत्पादनात ८.४ टक्के वाढ झाल्याचा सांगत या क्षेत्रातील चढता आलेख गोयल यांनी यावेळी मांडला. वीज तोटा ३.६ टक्क्यांवर आणतानाच उत्पादन क्षमता २२ हजार ५६६ मेगावॅटने तर वीज वितरणाचे जाळे २२ हजार १०० सर्किट किलोमीटरने वाढविण्यात आली आहे. वीज उत्पादनाने पहिल्यांदाच १ लाख कोटी युनिटचा आकडा पार केला आहे. वीज वितरण कंपन्यांमध्ये १.०९ लाख कोटींची गुंतवणूक व्हावी म्हणून नव्या योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील कोळसा खाणी कर्नाटकला देण्यात आल्याच्या आरोपाबाबत बोलताना गोयल म्हणाले की, देशात केवळ सहा राज्यात कोळशाचे उत्पादन होते. प्रत्येक राज्यातील विजेचा प्रश्न सोडवायचे असेल तर कोळशासारख्या राष्ट्रीय संपत्तीच्या वाटपात समन्वय साधणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आधीच दोन महत्वाच्या आणि जास्त क्षमतेच्या खाणी आहेत. शिवाय अन्य राज्यातूनही कोळसा पुरविला जातो. त्यामुळे प्रांतिक भूमिका घेणे चुकीचे असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. येत्या पाचवर्षात कोल इंडियाच्या उत्पादनात दुपटीने वाढ करण्यात येणार असून, ते प्रतिवर्ष १०० कोटी टन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर, पर्यावरण पूरक ऊर्जानिर्मितीसाठी सौरऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे. २०१४-१५ या सालात देशातील सौरऊर्जेच्या क्षमतेत ४२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. १४ राज्यांतील १७ सौरप्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याद्वारे देशांतर्गत सौरऊर्जेची क्षमता तीसपट वाढविण्याचे लक्ष्य आहे, असे गोयल म्हणाले. एलईडी बल्बच्या माध्यमातून किमान दहा टक्के वीज वाचविता येणार आहे. त्यासाठी येत्या तीन वर्षात देशभर एलईडी दिवे बसविणार. २०१६ पर्यंत ९० लाख एलईडी बल्बद्वारे रस्ते प्रकाशमान करणार. पारदर्शक खरेदी प्रक्रीयेमुळे ३१० रुपयांच्या एलईडी बल्बची किंमत ८२ रुपयांपर्यंत खाली आणली. १८ राज्यांतील १५१ शहरांत घरेलू कुशलता प्रकाश कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे गोयल म्हणाले.