शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:02 IST

पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आवश्यक- सर्वोच्च न्यायालय

डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने तेलुगू पत्रकार कोम्मिनेनी श्रीनिवास राव (केएसआर) यांना जामीन मंजूर केला.  एका टीव्ही कार्यक्रमात पॅनेलिस्टच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. केएसआर हे ७० वर्षांचे ज्येष्ठ पत्रकार व टीव्ही अँकर असून, ‘लाइव्ह विथ केएसआर’ हा कार्यक्रम साक्षी टीव्हीवर सादर करतात. ६ जून २०२५ रोजी या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणादरम्यान एका पॅनेलिस्टने अमरावती (आंध्र प्रदेश) ही वेश्यांची राजधानी आहे. तेथे एड्सग्रस्त लोक राहतात, असे विधान केले. केएसआर यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला नाही, उलट ते हसताना दिसले, असा  केएसआर यांच्यावर आरोप आहे. 

मुकुल रोहतगी, सिद्धार्थ लुथरा आणि अन्य वकिलांनी युक्तिवाद केला की, केएसआर हे निष्क्रिय प्रेक्षक नव्हते. त्यांनी पॅनेलिस्टला उत्तेजन दिले. त्यांच्या हसण्याने वक्तव्याला अप्रत्यक्ष अनुमती दिली. त्यांना नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगावे. तथापि, न्या. प्रशांत कुमार मिश्रा व न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा असल्याने उच्च न्यायालयात पाठविण्यास नकार दिला. 

...आपण हसलो, त्यामुळे सहआरोपी ठरतो का?न्यायालयाने विचारले, ‘जर कुणी विचित्र विधान केले आणि आपण त्यावर हसलो, तर त्यामुळे आपण सहआरोपी ठरतो का? लाइव्ह कार्यक्रमांमध्ये असे प्रकार नेहमी घडतात. पत्रकाराची प्रतिष्ठा आणि भूमिका लक्षात घेता त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.’  

हसणे हे गुन्ह्यात मदत नव्हे८ जून २०२५ रोजी केएसआर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या द्वेषभावना पसरवणे,  खोटे पुरावे, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला,  सदोष मनुष्यवध, दरोडा, कट रचणे यासाठी विविध कलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम व ॲट्राॅसिटी ॲक्ट खाली गुन्हा नोंदविण्यात आला. केएसआर यांना ९ जूनला अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे, ॲड. श्रीवर्धन धूत व रामेश अल्लांकी यांनी युक्तिवाद केला की, केएसआर यांनी स्वतः कोणतेही वक्तव्य केले नाही किंवा पॅनेलिस्टच्या वक्तव्याला दुजोरा दिला नाही. ते केवळ अँकरिंग करत होते. हसणे म्हणजे गुन्ह्यात मदत नव्हे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयJournalistपत्रकार