बलात्कारप्रकरणी प्राचार्य अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 04:05 IST2017-10-04T04:04:39+5:302017-10-04T04:05:05+5:30

लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून, सरकारी शाळेच्या विवाहित प्राचार्याला (४२) सोमवारी अटक करण्यात आली

Prosecution of raping accused | बलात्कारप्रकरणी प्राचार्य अटकेत

बलात्कारप्रकरणी प्राचार्य अटकेत

कोरापूट (ओडिशा) : लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून, सरकारी शाळेच्या विवाहित प्राचार्याला (४२) सोमवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याला अटक झाली.
नंदापूर गटात (जि. कोरापूट) ही निवासी शाळा आहे. चौकशीत प्राचार्याने मुलीशी मी तिला लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर, गेल्या एप्रिलपासून शारीरिक संबंध होते, असे कबूल केले, असे पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलाश चंद्र सेठी यांनी सांगितले. तथापि, प्राचार्याने मुलीशी पहिल्यांदा गेल्या जानेवारी महिन्यात शारीरिक संबंध सुरू केले, असा दावा सेठी यांनी केला. प्राथमिक चौकशीच्या आधारावरून त्याला निलंबित करण्यात आले आहे, असे कोरापूटचे जिल्हाधिकारी अनुपम साहा यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. 

Web Title: Prosecution of raping accused